….तर संतोष देशमुख जीवंत असते, काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टात आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब सादर करण्यात आला आहे या जबाबावरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंजली दमानिया यांनी आरोपी सुदर्शन घुले यांचा जबाब अपूर्ण आहे. सगळे लपवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे ? असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
हे काहीच कोर्टासमोर आलेले नाही
अंजली दमानिया यांनी पुढे म्हणाल्या की एका स्टँडर्ड फॉर्मेट सारखा तिघा आरोपींचा कबुली जबाब आहे. खुनानंतर त्यांनी पळून जायचं कस ठरवलं, कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्या बरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पळाले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का? ते कुठे कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस थांबले होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं ? कृष्णाला त्यांनी काय केले? सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा आणि कधी झाला ? डॉ. वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले ? हे काहीच कोर्टासमोर आलेले नाही.
सुदर्शन घुले हे त्यांच्याबरोबर नव्हते आणि त्यांना अटक सुद्धा काही काळानंतर झाली होती तर सुदर्शन घुले यांनी हत्येनंतर काय केलं ? याचा त्या जवाबात कुठेही उल्लेख नाहीए आणि गेले कुठे राहिले? भिवंडीत नेमके किती दिवस होते ? पुण्यात किती दिवस होते ? त्यांना मदत कोणी केली ? कराड यांच्याशी संभाषण झालं की नाही काहीही जबाबात लिहिलेलं नाहीए असा प्रश्न पडतो. एडव्होकेट उज्वल निकम यांनी कोर्टामध्ये जे मांडले मला तर तेही कम्प्लीटली चुकीची वाटत आहे.
घटनाक्रमाची सुरुवात खंडणीपासून झाली होती, सुरुवात 8 ऑक्टोबर पासून झालेली नाही.पहिला एफआयआर आवादा कंपनीचा मे महिन्यात झाला होता. 28 मे रोजी अवादाच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं होतं. तुझे हातपाय मोडू आणि तुला म्हणजे जीवे मारू अशा ज्या धमक्या देऊन त्याचे अपहरण करण्यात आलं होतं, ते 28 मे ला झालं आहे. जून महिन्यात धसाच्या आरोपाप्रमाणे सातपुडा बंगल्यात खंडणीची बोलणी झाली होती.
तर आज संतोष देशमुख जीवंत असते….
आज जी माहिती आली आहे की तो आईला भेटण्यास होता, त्याला साडेतीन तास पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबवण्यात आलं होते. आणि साडे तीन तास जर त्याला थांबवलं नसतं जर त्याचवेळी प्रशांत महाजन यांनी कारवाई केली असती, तर आज संतोष देशमुख जीवंत असते असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
एका महिलेची हत्या झाल्याची माहीती आहे
अशा अधिकाऱ्यांचं नाव देखील नाही, पोलीसांना कुठलाही सह आरोपी केलेले नाही. मला धक्कादायक वाटतं की हे प्रशांत महाजन सारखे ऑफिसर आता जज बरोबर होळी खेळतात ! मला हे संपूर्णच गोडबंगाल काय आहे आणि आत्ताच एक महिन्यापूर्वी एक माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या प्रकरणात एका महिलेची हत्या झाल्याची ही माहिती आहे. मी त्याबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List