नागपूर तणाव : पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन सुरु, महाल भागात दंगल नियंत्रण पथक दाखल
नागपूरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावावा आवरताना पोलिस आणि नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले असून उपराजधानी नागपुरच्या महाल परिसरात कोबिंग ऑपरेशन सुरु केले आहे.
राज्यात ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अचानक औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वक्तव्ये केली होती. त्यावरुन राजकारण सुरु असताना आज नागपूरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. या मोर्चात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा तणाव निवळला. परंतू सायंकाळी पुन्हा दोन गटात महाल परिसरात दगडफेक सरु करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.यावेळी जमावाने दोन जेसीबींना जाळण्यात आल्या. या दगडफेकीत १० ते १५ पोलिसही जखमी झाले आहेत.
कोबिंग ऑपरेशन सुरु
या दगडफेकीनंतर पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या ठिकाणांवरुन अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी केले आहे. आमच्याकडे एक एसआरपीएफची कंपनी होती इतर तीन कंपन्या बोलविण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List