तुमच्या आई-बहिणीचा व्हिडीओ पहा..; कास्टिंग काऊचची क्लिप शेअर करणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री
प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणन हिच्या कास्टिंग काऊचचा व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर तिने तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रायव्हेट व्हिडीओ शेअर करणाऱ्यांसाठी श्रुतीने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्याचसोबत तो व्हिडीओ शेअर न करण्याची विनंतीसुद्धा तिने केली आहे.
श्रुती नारायणनची पोस्ट-
माझ्याबद्दलचा हा सर्व कंटेंट पसरवणं हे तुमच्यासाठी फक्त एक मस्करी आणि मजेचा विषय आहे. पण माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे. विशेषकरून माझ्यासाठी ही अत्यंत कठीण वेळ आहे आणि ही परिस्थिती हाताळणंही खूप कठीण आहे. मी सुद्धा एक मुलगी आहे, माझ्यासुद्धा भावना आहेत आणि माझ्या जवळच्या व्यक्तींच्याही भावना आहेत. तुम्ही लोकं ही परिस्थिती फक्त आणखी वाईट आणि खराब करू पाहताय.
मी तुम्हा सर्वांना नम्रपणे विनंती करते की अशापद्धतीने वणव्यासारखं सर्वकाही पसरवू नका आणि असं असेल तर तुमच्या आईचे, बहिणीचे किंवा गर्लफ्रेंडचे व्हिडीओ पहा कारण त्यासुद्धा मुली आहेत. त्यांचं शरीरसुद्धा माझ्यासारखंच आहे. त्यामुळे जा आणि त्यांचे व्हिडीओ एंजॉय करा.
आणखी एका पोस्टमध्ये श्रुती नारायण तिला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली आहे. त्यात तिने लिहिलं, ‘हे एका व्यक्तीचं आयुष्य आहे तुमच्यासाठी मनोरंजन नाही. मी अनेक कमेंट्स आणि पोस्ट पाहतेय, ज्यामध्ये पीडितेवर आरोप केला जातोय पण मी पुरुषांना विचारू इच्छिते की का? प्रत्येक वेळी महिलेवरच का प्रश्न उपस्थित केले जातात? जे लोक हे व्हिडीओ लीक करत आहेत आणि पाहत आहेत त्यांना का सवाल केला जात नाही? यावर लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत, ते घृणास्पद आहे. प्रत्येक महिलेचं शरीर एकसारखंच असतं, तुमच्या आईसारखं, आजीसारखं, बहिणीसारखं किंवा पत्नीसारखं. ही काही मोठी गोष्ट नाही. हा फक्त व्हिडीओ नाही, हे एखाद्याचं मानसिक स्वास्थ्य आणि आयुष्य आहे. एआय जनरेटेड आणि डीप-फेक व्हिडीओ हे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. तुम्ही अशा व्हिडीओंना समर्थन देत असाल तर तुम्हीसुद्धा समस्येचा भाग आहात. शेअर करणं थांबवा. लिंक मागणं थांबवा.’
‘माणूस म्हणून वागायला सुरुवात करा. खरे, लीक केलेले किंवा डीपफेक व्हिडीओ शेअर करणं हा भारतात गुन्हा आहे. असं करणाऱ्यांवर खालील कलमांअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते’, असं म्हणत तिने कलमांची यादी शेअर केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List