मोठी बातमी! अभिनेत्री दिशा पटाणीमुळे वाढले होते दिशा सालियानचे टेन्शन, नेमकं काय झालं होतं?
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात सतत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादाखक खुलासे समोर आले आहेत. अभिनेत्री दिशा पटाणीने देखील या प्रकरणात जबाब नोंदवला आहे. आता दिशा पटाणीचे या प्रकरणाशी काय कनेक्शन आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दिशा पटाणीमुळे वाढले होते दिशा सालियानचे टेन्शन
दिशा सालियान ही कॉर्नरस्टोन कंपनीत काम करत होती. या कंपनीच्या जाहिरातीशी अभिनेत्री दिशा पटाणीचे थेट संबंध होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात जबाब नोंदवला होता. दिशा पटाणीने कॉर्नरस्टोन या कंपनीशी जाहिरातीसाठी करार केला होता. कंपनीने दिशाशी संवाद ठेवण्याची आणि बोलणी करण्याची जबाबदारी दिशा सालियनवर दिली होती. त्यामुळे दिशा सालियान ही थेट दिशा पटाणीशी संवाद साधत असे.
Photo: अथिया शेट्टीने दाखवली लेकीची झलक? फोटोची सोशल मीडियावर चर्चा
दिशा पटाणी आणि कॉर्नरस्टोन कंपनीशी जाहिरातीसंबंधी करार केला होता. पण या करारामध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टी करण्यास अभिनेत्री दिशा पटाणीने थेट नकार दिला होता. त्यामुळे दिशा सालियन टेन्शनमध्ये आली होती. तिला काय करावे सुचत नव्हते.
मिलिंद सोमणचा देखील नोंदवला जबाब
मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केल होत. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. मिलिंद सोमणने #banchinaproducts हे ट्विट केल होते. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्ठात आल्याने मी केलेले ट्वीट डिलीट करणार नाही अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा तणावात होती हेही एक कारण.
नेमकं काय आहे क्लोजर रिपोर्टमध्ये
पोलिसानी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केल्याचे नमूद करत ती कोणत्या कारणास्तव तणावात होती हे स्पष्ट केले होते. वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List