बँकेतील 78 हजार कोटी रुपये कोणाचे! 10 वर्षांपासून पैशांना कोणीच विचारायला येईना
देशातील वेगवेगळ्या बँकेत तब्बल 78 हजार कोटी रुपये पडून आहेत. गेल्या 10 वर्षांत या पैशांना विचारण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. हा पैसा नेमका कोणाचा आहे. यावर दावा करायला कोणीच न आल्याने या पैशांतील 45 हजार कोटी रुपये विशेष फंडामध्ये पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बँकांनी 2019-20 ते 2024-25 या दरम्यान 45 हजार 706 कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडामध्ये ट्रान्सफर केली आहे. ही रक्कम बँकेत पडून असून यावर कोणीच दावा सांगत नाही. तसेच गेल्या 10 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे ही रक्कम अनक्लेम्ड डिपॉझिट मानली जात आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड स्कीम ही 2014 मध्ये लाँच करण्यात आली होती. बँकेत पडून असलेल्या रकमेवर दावा सांगण्यासाठी आरबीआयने एक पोर्टल सुरू केले आहे. त्याद्वारे फंडातील रक्कमेवर दावा करता येऊ शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List