अपहरण करून हत्या करणारा अटकेत
चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या अक्षय गरुड याला अखेर कांदिवली पोलिसांनी सुरत येथून अटक केली. अंश अन्सारी हा त्याच्या आईसोबत कांदिवलीच्या इराणीवाडी येथे गेला होता. शनिवारी पहाटे एकाने अंशला बेदम मारहाण केली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अंशला मृत घोषित केले. याची माहिती समजताच कांदिवली पोलिसांनी तपासासाठी सहा पथके तयार केली. पोलिसांनी गोरेगाव ते दहिसर परिसरातील 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये अक्षय दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. अक्षय हा अंशच्या वडिलांसोबत काम करत होता. अक्षय हा गुजरातला असल्याचे समजताच त्याला सुरत येथून ताब्यात घेऊन अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List