काकडवाडीतील मंदिरावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड, 26 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त

काकडवाडीतील मंदिरावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड, 26 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर दरोडा टाकून देवीचे दागिने, पान आणि मुखवटा असा लाखो रुपयांचा ऐवज लुटणारी टोळी नगर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. त्यांच्याकडून एकूण 26 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टोळी प्रमुख सुयोग अशोक दवंगे (वय – 21), सचिन दामोदर मंडलिक (वय – 29, रा. संगमनेर), संदीप किसन साबळे (वय – 23, रा. पाचपट्टा, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय – 23, रा. सोमाटणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम (वय – 21), दीपक विलास पाटेकर (वय – 24, दोघेही रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर गेल्या रविवारी (9) चोरट्यांनी दरोडा घालून देवीचे दागिने, पान आणि मुखवटा असा लाखो रुपयांचा ऐवज लांबवला होता. जाताना चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीशी जोडलेला डीव्हीआरही पळवल्याने या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा समांतर तपास अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. त्यानुसार शाखेने तपासकामी विशेष पथक स्थापन करून प्रकरणाचा तपास सुरू केला असतानाच या प्रकरणाचा सूत्रधार हिवरगाव पावसा येथील सुयोग दवंगे असल्याचे समोर आले. तो आपला साथीदार सचिन मंडलिक याच्या मदतीने चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी लोणीमार्गे अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी लोणी ते कोल्हार रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी काळ्या रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार दिसून येताच पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यानुसार चालकाने काही अंतर आधीच वाहन उभे केले. मात्र, त्यातील तिघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या, तर वाहनात बसलेल्या तिघांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून 26 लाख
12 हजार 900 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

इतर मंदिरांतील चोरीची कबुली

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे या सर्वांना पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात चोरट्यांच्या या टोळीने काकडवाडीतील मंदिरावर दरोडा घालण्यापूर्वी 6 मार्च रोजी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीतील बालाजी मंदिर व नाशिक-पुणे महामार्गावरील वज्रेश्वरी मंदिरातही अशाच पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा
ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू...
weight loss tips: फॅटला छुमंतर करण्यासाठी रोज रात्री प्या ‘हे’ हर्बल टी
उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…
अर्धापूर-नांदेड मार्गावर कार- ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
परीक्षेत कमी गुण मिळाले, भविष्याच्या चिंतेतून पित्याने दोन मुलांना संपवून स्वतःची जीवनयात्रा संपवली!
लंडनमध्ये हायगेट स्मशानभूमीत 16 मार्चला डॉ. अशोक ढवळे यांचे कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान