धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा विनयभंग, TTE विरोधात गुन्हा दाखल

धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा विनयभंग, TTE विरोधात गुन्हा दाखल

धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा टीटीईने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोरखपूर-बंगळुरू ट्रेनमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून भुसावळ स्थानकात टीटीईविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित महिला गोरखपूर-बंगळुरु विशेष ट्रेनने कानपूरहून पुण्याला चालली होती. महिलेने सीट आरक्षित केली होती, मात्र ती आरएसी होती. यामुळे अन्य ठिकाणी सीट उपलब्ध आहे का तपासण्यासाठी महिलेने तिवारी नामक टीटीईकडे संपर्क साधला.

टीटीईने महिलेला सुरवातीला कोच बी/4 मध्ये बसण्यास सांगितले. नंतर कोच ए/1 मध्ये 5 नंबरची सीट देण्यात आली. महिला जेव्हा कोच ए मधील तिच्या सीटवर बसली तेव्हा तिवारीही तिच्या जवळ बसला. त्याने महिलेला चुकीचा स्पर्श केला. सुरवातीला महिलेने चुकून हे घडले समजून दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने महिला घाबरली.

घाबरेली महिला शौचालयात गेली आणि 15 ते 20 मिनिटे तिथेच राहिली. बाहेर आल्यानंतर तिवारी पुन्हा तिच्या जवळ होता. यानंतर तिने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. भुसावळ रेल्वे स्थानकात महिलेने तिवारीविरोधात तक्रार दाखल केली. मनमाड पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वाघ्या श्वान मी त्याला… ‘, वादात सदावर्तेंची उडी, संभाजीराजे छत्रपतींबद्दल केली मोठी मागणी ‘वाघ्या श्वान मी त्याला… ‘, वादात सदावर्तेंची उडी, संभाजीराजे छत्रपतींबद्दल केली मोठी मागणी
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वादाची ठिणगी पडली आहे,   संभाजीराजे छत्रपतींनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्याचे स्मारक तिथं नव्हते, असा दावा...
चालत्या ई-रिक्षाच्या छतावर रील बनवणे महागात पडले, तोल जाऊन पडल्याने इसमाचा मृत्यू
दिल्ली हादरली! मेरठ, बंगळुरु घटनेची पुनरावृत्ती, फ्लॅटमध्ये बेडच्या बॉक्समध्ये आढळला महिलेचा मृतदेह
मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका
MI Vs GT – रोहित शर्माने इतिहास रचला, असा विक्रम करणारा ठरला पहिला हिंदुस्थानी
समुद्रातील खनीज उत्खननाला राहुल गांधी यांचा विरोध; निविदा मागे घेण्याची केली मागणी
वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा