धारावीच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा रेकॉर्ड मोडला, ६३ हजार गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण

धारावीच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा रेकॉर्ड मोडला, ६३ हजार गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाने नवा टप्पा गाठला आहे. सध्या सुरु असलेल्या व्यावसायिक आणि निवासी गाळ्यांच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा ( साल २००७-०८ ) रेकॉर्ड मोडला आहे. सध्याच्या सर्वेक्षणात सुमारे ६३ हजाराहून अधिक गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तळ मजल्यावरील भाडेकरुंसह गाळ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ तळ मजल्यावरील भाडेकरूंच्या गाळ्यांना मोफत घरांसाठी पात्र मानले जाते.

‘आमच्या सर्वेक्षणाने एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. ही सरकारसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. हा पुनर्विकास प्रकल्प केवळ तळमजल्यावरील भाडेकरूंपुरता मर्यादित नसून, वरच्या मजल्यांवरील बांधकामांचाही यात समावेश होतो. त्यामुळे सरकार सर्वांसाठी घरे देण्यासाठी पुढाकार घेत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

नव्या सर्वेक्षणात ९५ हजारांहून अधिक गाळ्यांचे गल्लीबोळात जाऊन सर्वेक्षण झाले. यावेळी ८९ हजारांहून अधिक गाळ्यांना क्रमांक दिला आहे. तसेच ६३ हजारांहून अधिक गाळ्यांचे घरात जाऊन सर्वेक्षण केले झाले. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळमजल्यावरील भाडेकरूंची घरे, वरच्या मजल्यांवरील बांधकामे, सध्याच्या अस्तित्वातील एसआरए इमारती, आरएलडीए जमिनीवरील झोपडपट्टीवासी नागरिक, तसेच सर्व धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

त्यांचे सर्वेक्षण पुन्हा केले जाण्याची शक्यता कमी

आता आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. यातून स्पष्टपणे कळते की धारावीकर पुनर्विकासाच्या बाजूने असून ते सर्वेक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत.आम्ही सर्व रहिवाशांना लवकरात लवकर सर्वेक्षणात सहभाग होण्याचे आवाहन करीत आहोत. त्यामुळे पुढील टप्पे सुरू करता येतील. ज्या रहिवाशांनी सर्वेक्षणात भाग घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर स्वेच्छेने या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. ज्या भाडेकरूंनी किंवा रहिवाशांनी सर्वेक्षणात सहभाग घेण्यास नकार दिला आहे, किंवा वारंवार विनंती करूनही आवश्यक कागदपत्रे दिलेली नाहीत. त्या भाडेकरूंच्या घरांचे इथून पुढे सर्वेक्षण पुन्हा केले जाण्याची शक्यता कमी आहे असेही श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढलीय

नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ( एनएमडीपीएल ), विशेष उद्देश कंपनीतर्फे सुमारे १ लाख ५० हजार घरांच्या सर्वेक्षणाची तयारी केली गेली आहे. कारण बहुतेक झोपड्या या तळमजला अधिक दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढलेल्या आहेत. ज्यामुळे पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढली आहे.

अपात्र ठरतील, त्यांचे धारावीच्या बाहेरील पुनर्वसन

धारावीकरांकडून आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि याचा आम्हाला आनंद आहे. अद्याप सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या रहिवाशांना लवकरात लवकर पुढे यावे असेही एनएमडीपीएल प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच केले जाणार आहे. जे रहिवासी अपात्र ठरतील, त्यांना धारावीच्या बाहेरील आधुनिक वसाहतीत स्थलांतरित केले जाईल. या वसाहतीत चांगल्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयी उपलब्ध असतील. या नव्या वसाहती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) तयार होतील. त्यामध्ये मेट्रोसह इतर चांगल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असतील.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी...
काश्मिरात संगमनेरचे जवान रामदास बढे शहीद
पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले 507 कोटी रुपये
पालिका गुढीपाडव्याला पुरणपोळी देणार
30 वर्षे झाली तरी… रेवस ते रेडी सागरी महामार्ग अपूर्णच
कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना तांत्रिक अडचणी, वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र
हे सभागृह प्रशांत बंबच्या बापाचे नाही! अभिजीत वंजारी संतापले