उद्योगनगरीतील फायरमनभरती रखडली, निवड समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त नाही

उद्योगनगरीतील फायरमनभरती रखडली, निवड समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी ‘फायरमन रेस्क्युअर’च्या (अग्निशमन विमोचक) १५० जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दोन महिने होऊन गेल्यानंतरही फायरमनची भरती होत नसल्याचे चित्र आहे. निवड समितीच्या बैठकीला अद्यापि मुहूर्त मिळत नसल्यामुळे फायरमनच्या अंतिम यादीला उशीर होत आहे. त्यामुळे उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून आगीच्या सातत्याने घटना घडत आहेत. अशा घटना घडल्यानंतर तत्काळ आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सदैव तत्पर असतात. मात्र, शहरात वाढणाऱ्या मालमत्ता आणि लोकसंख्येमुळे सद्यःस्थितीत अग्निशमन दलाकडे असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. याचाच विचार करून महापालिका प्रशासनाने गतवर्षी अग्निशमन विभागासाठी १५० फायरमनची भरतीप्रक्रिया राबविली.

फायरमनच्या १५० जागांसाठी एक हजार ५०० अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाले होते. या परीक्षार्थीची २९ ऑगस्ट २०२४मध्ये पुणे शहरातील नऊ केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ८९५ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यास उशीर होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे, तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाचणी घेण्यास नकार दिल्याने ही परीक्षा रखडली होती. याविरोधात माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर साडेचार महिन्यांनंतर २२ ते २४ जानेवारी २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात १०० गुणांची शारीरिक क्षमता मैदानी चाचणी सिन्थेटिक मैदानावर घेण्यात आली.

फायरमन भरतीसाठी संदर्भात निवड समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. बैठक झाल्यानंतर चार दिवसांत पात्र उमेदवारांची अंतिम यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर तत्काळ पात्र उमेदवारांना अग्निशमन विभागात रुजू करून घेतले जाईल.

विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
चेंबूर येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली...
वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार – भाजपा नेत्याची जहरी टीका, महायुतीतच कलह
वय 44 वर्षे, 2 मुलांची आई, पण भल्याभल्या अभिनेत्रींना टाकते मागे; ‘ही’ ग्लॅमरस हिरोईन आहे तरी कोण?
चेंबूरमध्ये बिल्डरच्या कारवर गोळीबार, एक जण जखमी
IPL 2025 – राजस्थानला 58 धावांनी धुळ चारत गुजरातने मारला विजयी चौकार, पहिला क्रमांक पटकावला
सुप्रिया सुळेंचं रस्त्यासाठी उपोषण, अजितदादा नेमकं काय म्हणाले
40 हजार रुपयांसाठी महिलेचा मृतदेह 6 तास अडवून ठेवला,आंदोलनाचा इशारा देताच,काय घडले पाहा ?