गर्भाशयातून डॉक्टरांनी काढला तब्बल पावणे 17 किलोचा मांसाचा गोळा, आता ती आई होऊ शकणार
एका महिलेच्या वारंवार ओटी पोटात दुखत होते. पोटाचा घेर देखील वाढत चालला होता. तिला वाटले ती गर त्यामुळे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या पोटात तब्बल साडे सोळा किलोचा मासांचा गोळा निघाला आहे. या महिलेची शस्रक्रिया करण्यात आल्यानंतर हा मासांचा गोळा साडे सोळा किलोचा असल्याचा उलगडा झाला तेव्हा डॉक्टरांना देखील धक्का बसला आणि त्यानंतर डॉक्टरांनी या ट्युमरची गिनीज बुकात नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे.
अकोला येथील एका महिलेच्या पोटातून तब्बल साडे सोळा किलोचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या ट्युमरचा आकार आणि वजनाचा रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात साली पाठवला आहे. 2 वर्षापासून मूलबाळ नसणारी परभणी येथील ही महिला अचानक पोटाचा आकार वाढत चालल्याने आणि पोट दुखीने त्रस्त होती. तिने अकोल्यातील डॉक्टरांना आशेने दाखवले तेव्हा तिच्या पोटात दुसरे तिसरे काही नसून चक्क मासांचा गोळा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर या महिलेवर शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अकोला शहरातल्या लक्ष्मीनारायण मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया पार पडली. प्रसूती आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मुकेश राठी यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.
साडे सोळा किलोचा मासाचा गोळा
महिला रुग्ण गेल्या दोन वर्षांपासून पोट दुखण्याने त्रस्त होती. तिने या संदर्भात अनेक उपचार घेतले. मात्र दुखणे बरे होऊ शकले नाही. म्हणून ती परभणीहून अकोल्यात उपचारा साठी आली होती. या महिलेच्या गर्भाशयात तब्बल साडे सोळा किलोचा मासाचा गोळा आढळला आहे. तब्बल 2 तास या महिलेवर शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर या महिलेच्या पोटातून मांसाचा गोळा काढण्यात यश आल्याने या महिलेला नवजीवन मिळाले आहे. ट्युमरचा आकार आणि वजनाचा गिनिज रेकॉर्ड बुकमध्ये नोंदणी करण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे प्रसूती आणि स्री रोग तज्ञ डॉ. मुकेश राठी यांनी सांगितले. ही गाठ नेमकी कशामुळे झाली हे समजू शकलेले नाही.
त्यामुळे ती आई बनू शकणार आहे
डॉ. मुकेश राठी यांनी या रुग्ण महिलेच्या तपासण्या करून शस्त्रक्रियेची जटीलता जाणून घेतली आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेत महिलेच्या गर्भाशयातून 16.75 किलो वजनाचा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे ती आई बनू शकणार आहे. आता या महिला रुग्णाची तब्येत चांगली असून चालणे, फिरणे, खाणे-पिणे सुरू झाले आहे. तिला दोनच दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. मांसाचे काही नमुने वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवले असल्याचही राठी यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List