कुणाल कामराच्या व्हिडीओवरून वाद; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, कोणाला सुनावलं?

कुणाल कामराच्या व्हिडीओवरून वाद; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, कोणाला सुनावलं?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरून चांगलाच वाद झाला. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने या प्रकरणात माफी मागावी अशी मागणी होत आहे. यावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणाल कामरा हा कॉमेडियन आहे, तो जे बोलला ते कॉमेडियनकडून अपेक्षित नाही, मात्र नंतर वापरलेली शिवराळ भाषा आणि तोडफोड देखील योग्य नाही, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया?

कुणाल कामरा हा कॉमेडियन आहे, तो जे बोलला ते कॉमेडियनकडून अपेक्षित नाही, मात्र नंतर वापरलेली शिवराळ भाषा आणि तोडफोड देखील योग्य नाही. कुणालला असं काही बोलण्याची काहीच गरज नव्हती. शिंदे यांच्या पक्षाला ठणकावून सांगायचं आहे की आता बास. तोडफोडीची वसुली झाली पाहिजे. कोरटकर चिल्लर माणूस आहे ,असं म्हणणारे मुख्यमंत्री त्याला का पाठीशी घालत आहेत ? हे सगळं खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे. गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. कारवाई का होतं नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगवं.  निरुपम, राणे यांच्याकडून गुंडगिरीची भाषा वापरली जाते. ही भाषा, दादागिरी कधी बंद होणार? असं आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना वाटतं असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला काही पत्रकारांकडून माहिती मिळाली 22 तारखेला नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. तो विषय बाजूला करण्यासाठी तर असं बोलून घेतलं नसेल ना ? हे राजकारण खूप खालच्या स्तराला गेलं आहे. कॉमेडियनकडून अशी भाषा बोलून घेतली जात असेल तर हे चुकीचं आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्यावरून देखील दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रश्न असा आहे की 3 महिने उलटले तरी कृष्णा आंधळे फरार कसा आहे? त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची नावं चार्जशीटमध्ये का नाहीत?  त्यांना आणखी सहआरोपी केलं गेलेलं नाही, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

15 वर्षांनी लहान अभिनेत्रीसाठी पत्नीलाही सोडायला तयार होता रोहित शेट्टी? कोण आहे ती? 15 वर्षांनी लहान अभिनेत्रीसाठी पत्नीलाही सोडायला तयार होता रोहित शेट्टी? कोण आहे ती?
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींमध्ये लव्ह-हेट रिलेशनशिप पहायला मिळतं. इंडस्ट्रीत एका क्षणात ब्रेकअप आणि पॅचअपचे खेळ खेळले जातात. यात केवळ अभिनेता आणि...
‘छावा’ सिनेमामुळेच नागपूरमध्ये राडा, ‘ही’ व्यक्ती जबाबदार, स्वरा भास्कर म्हणाली, ‘मुर्ख…’
राज बब्बरच्या मुलाने हटवलं वडिलांचं आडनाव; सावत्र भावाने मारला टोमणा “नाव बदलल्याने..”
यंदा उन्हाळ्यातही अभ्यासाला सुट्टी नाही! शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन अध्यापन करावे लागणार
बीडमधील आमदारावर आरोप अन् अपहरण, पोलिसांची उडाली धावपळ
मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली 50 रुपयांची खंडणी, पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याचा भाजीपाला आठवडे बाजारातून पळवला
मानलेल्या भावासह प्रियकराचा विवाहितेवर सामूहिक अत्याचार, बार्शीत नात्याला काळिमा फासणारी घटना