‘लाली गंधर्व’ असे म्हणत किशोरी अंबिये का होताहेत सोशल मीडियावर ट्रोल! वाचा

‘लाली गंधर्व’ असे म्हणत किशोरी अंबिये का होताहेत सोशल मीडियावर ट्रोल! वाचा

सोशल मीडिया आणि मीम्स या दोन्ही गोष्टी अगदी हातात हात घालून कायमच चालतात. मीम्सचं जग हे एका घटनेवर आणि एका कुठल्याशा निमित्तावर चालतं. समाजातील अनेक घडामोडींवर भाष्य करणारे मीम्स हा सोशल मीडियाचा आत्मा आहे. मीम्स म्हटल्यावर त्यामागे मीम्सप्रेमी सुद्धा आलेच. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर मराठीतील अनेक कलाकार या ना त्या कारणाने आपल्याला ट्रोल होताना दिसताहेत. यात आजही अगदी आघाडीवर असलेले नाव म्हणजे सचिन पिळगांवकर, स्वप्नीला जोशी, संतोष जुवेकर हे कायमचे ट्रोल होणारे सदस्य आहेत. यात आता भर पडलीय किशोरी अंबिये यांची.

किशोरी अंबिये या सोशल मीडियावर सतत रिल्स पोस्ट करत असतात. यामध्ये त्यांच्या शूटिंगमधील कलाकारांच्या गमती जमती तसेच दिवसभरातील घडामोडी असतात. किशोरी अंबिये यांचे रिल्स हे ट्रेंड सुद्धा होत असतात. त्यामुळे त्यांना नुकतेच रिल्सविषयी विचारल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा त्या ट्रोल होऊ लागल्या आहेत. किशोरी अंबिये यावेळी म्हणाल्या, ”दिवस उजाडताच लोक माझ्या रिलची वाट बघत असतात, त्यामुळे त्या प्रचंड ट्रोल झालेल्या आहेत. त्यांना म्हणूनच सोशल मीडियावर लाली गंधर्व असे चिडवण्यात येत आहे.” संतोष जुवेकर याच्यानंतर सध्याच्या घडीला किशोरी अंबिये या प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत.

किशोरी अंबियेच्या या वक्तव्यावर एकजण असे म्हणाला, संत्या तुला काॅम्पिटिशन आली आहे बघ… तर दुसऱ्याने असं म्हटलंय की, संत्या तुझी बहिण आली बघ.. तर एकाने तर लाल हैं व्हर्जन ३.० असेही म्हटले आहे.

एखादी व्यक्ती सतत स्वतःची वाहवा करत असेल तर त्याला माझीच लाल करणे असं म्हणतात. किशोरी अंबिये यांना अखिल भारतीय माझीच लाल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे म्हटले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा, नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा, नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप
पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात आज चक्क नोटा उधळल्या. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत,...
यात्रांसाठी नारायणगावची तमाशा कलापंढरी सज्ज
तहसीलदार ज्योती देवरे यांना सुप्रीम दणका, खेडमधील नियुक्ती ठरवली रद्द
पैठणचा पाणीपुरवठा खंडित, नाथसागरच्या पायथ्याशी आजपासून पाणीबाणी
विधान भवनाबाहेर गोंधळ, तरुणांचं झाडावर चढून आंदोलन
पंतप्रधान मोदींनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे, संजय राऊत यांचा घणाघात
एकनाथ शिंदे काय म्हणतात त्यावर या देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरत नाही – संजय राऊत