एमसी स्टॅन मुलींना करतोय असे मेसेज, स्क्रिनशॉट व्हायरल, ज्यामुळे ट्रोल होतोय रॅपर

एमसी स्टॅन मुलींना करतोय असे मेसेज, स्क्रिनशॉट व्हायरल, ज्यामुळे ट्रोल होतोय रॅपर

Bigg Boss 16 winner Mc Stan: रॅपर एमसी स्टॅनच्या नावाने प्रसिद्ध अल्ताफ शेख कायम वादाच्या भोवऱ्यात असतो. आता देखील एमसी स्टॅनचे काही स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काही इंन्फ्लुएसर्सने एमसी स्टॅनचे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंन्फ्लुएसर्सने सोशल मीडियावर पोस्ट केलेले स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इंन्फ्लुएसर्सने पोस्ट केलेल्या स्क्रिनशॉर्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेला एमसी स्टॅन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी एमसी स्टॅन गायब झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एमसी स्टॅन गायब झाल्याचे पोस्टर देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तेव्हा लोकांनी एमसी स्टॅन निशाणा साधला. फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी उचलेलं पाऊल… असं अनेक जण म्हणाले.

आता एमसी स्टॅन मुलींना फ्लर्टी मेसेज करत असल्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच एका रेडिट युजरने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये एमसी स्टॅनने एका इंन्फ्लुएंसरला मेसेज केला आहे. स्टॅन याने रेया (Rehya) नावाच्या एका इन्फ्लुएंसर फ्लर्ट करणारे मेसेज केले आहेत. ‘एमसी स्टॅन रेयाच्या ब्रोकन फोनवर…’

दुसऱ्या इंन्फ्लुएंसरला देखील एमसी स्टॅन याने मेसेज केला आहे. व्हायरल होत असलेल्या स्क्रिनशॉटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझ्या डीएम मध्ये एमसी स्टॅन काय करतोय…’, स्क्रिनशॉर्ट पाहिला तर, एमसी स्टॅन याने मेसेज केला आहे की. ‘मला तुझा फोन नंबर मिळेल… तू खरंच खूप सुंदर आहेस…’ सध्या स्क्रिनशॉट तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, रॅपरने नायला हुसैन नावाच्या एका इंन्फ्लुएंसरला देखील मेसेज पाठवले आहेत.

एमसी स्टॅन होतोय ट्रोल…

एमसी स्टेनच्या डीएमचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामुळे रॅपरला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे. एका यूजरने म्हटले की, शांतता मिळाली, अपमान झाला. काही लोकांनी रॅपरला भितीदायक असे वर्णन केले. “हे लाजिरवाणे आहे…’, ”प्रचंड लाज वाटणारी गोष्ट’ असं देखील ट्रोलर्स म्हणाले आहेत.

4 महिने झगमगत्या विश्वापासून दूर एसमी स्टॅन

तुम्हाला माहिती असेल की, 2024 मध्ये एमसी स्टेनने खुलासा केला होता की त्याने त्याची गर्लफ्रेंड बूबासोबत ब्रेकअप केलं आहे. जेव्हापासून त्याने ब्रेकअपची घोषणा केली तेव्हापासून तो सोशल मीडियावरून गायब आहे. त्यांनी शेवटची पोस्ट 30 नोव्हेंबर 2024 रोजी पोस्ट केली होती. तेव्हापासून तो सोशल मीडियावरून बेपत्ता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी...
काश्मिरात संगमनेरचे जवान रामदास बढे शहीद
पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले 507 कोटी रुपये
पालिका गुढीपाडव्याला पुरणपोळी देणार
30 वर्षे झाली तरी… रेवस ते रेडी सागरी महामार्ग अपूर्णच
कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना तांत्रिक अडचणी, वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र
हे सभागृह प्रशांत बंबच्या बापाचे नाही! अभिजीत वंजारी संतापले