Chhattisgarh Blast – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून एसटीएफच्या वाहनावर IED स्फोट, 2 जवान जखमी

Chhattisgarh Blast – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून एसटीएफच्या वाहनावर IED स्फोट, 2 जवान जखमी

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आयईडी स्फोट घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी एसटीएफ जवानांच्या पिकअप वाहनाला लक्ष्य केले. वाहनावर स्फोट केला. यानंतर जवानांवर गोळीबार केला. यात दोन जवान जखमी झाले. जिल्ह्यातील मद्दीद आणि भोपाळपट्टणम दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील गोरला नाल्याजवळ स्फोट झाला.

एसटीएफचे जवान नक्षलविरोधी कारवाईवरून परतत असताना आयईडी स्फोट झाला. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सैनिकांवर गोळीबारही केला, ज्यामध्ये दोन सैनिक जखमी झाले. विजापूर एसपींनी घटनेची पुष्टी केली आहे.

स्फोटामुळे कोणत्याही वाहनाचे किंवा जवानांचे गंभीर नुकसान झालेले नाही. आयईडी स्फोटाच्या शॉक वेव्हजमुळे वाहनाच्या चालकासह दोन सैनिकांना किरकोळ दुखापत झाली. जखमी जवान आणि चालकाला आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर, पुढील उपचारांसाठी विजापूर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे विजापूरचे अतिरिक्त एसपी चंद्रकांत गोवर्णा यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बडा नेता सोडणार साथ, उद्या मुंबईत मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बडा नेता सोडणार साथ, उद्या मुंबईत मोठा पक्षप्रवेश
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं,  महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात...
टीव्ही नाईन मराठीने मायलेकाची व्यथा जगासमोर आणली, दगडाला बांधलेल्या मुलाला मिळाला एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात
मनसेच्या कामगार सेनेच्या नेत्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, अपहरण केल्याचाही आरोप
मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले सुप्रिया सुळे अन् रोहित पवार…
‘सिकंदर’ मध्ये दिसणार सलमान खानची ‘ही’ एक्स गर्लफ्रेंड, अनेकदा राहिलीये सलमानच्या घरी
“मी माझ्या पलंगाखाली लपून बसणाऱ्यातला नाही…” कुणाल कामराचं थेट शिंदेंनाच आव्हान तर पोलिसांवरही प्रश्नचिन्ह
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलींमध्ये चकमक, कमांडरसह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा