आरोग्य क्षेत्राच्या निधीत सहा टक्क्यांनी घट, आरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

आरोग्य क्षेत्राच्या निधीत सहा टक्क्यांनी घट, आरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. पण या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राच्या निधी सहा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी रुपये 28 हजार 906.92 कोटी निधी दिला होता. यंदा त्यात कपात करून आरोग्य क्षेत्राला 27 हजार 164.91 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये कपात केल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने या बाबात वृत दिले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी 1 हजार 687 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी शक्यता होती. पण गेल्या वर्षी आणि यंदाही राज्य सरकारकडून या योजनेसाठी 650 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

ठाण्यात 200 खाटांचे रुग्णालय, रत्नागिरीत 100 खाटांचे रुग्णालय तर रायगडमध्ये 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्य सरकारने आर्थिक क्षेत्रावरचा बजेट कमी केल्याने या थेट फरक शहरी भागावर होईल अशी भिती जन स्वास्थ्य अभियान संस्थेचे डॉ. रवी दुग्गल यांनी यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने हॉस्पिटल आणि डिस्पेन्सरीसाठी गेल्या वर्षी 6 हजार 98 कोटी रुपये दिले होते. यंदा त्यात घट होऊन केवळ 4 हजार 709 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2 हजार 860 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी या अभियानाला 3 हजार 805 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी कमी केल्याने ग्रामीण आरोग्य क्षेत्रावर परिणाम होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागासाठी गेल्या वर्षी 9 हजार 667 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातही घट होऊन यंदा 9 हजार 57 कोटी रुपये देण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी गेल्या वर्षी 196.79 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातही घट होऊन यंदा फक्त 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11)...
कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग
धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान कार्ड
शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला! फडणवीसांचं ठरलंय… शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका
गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू
लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार
राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे