AC Blast – एसीच्या कंप्रेसरमध्ये अचानक स्फोट, चौघांचा मृत्यू; एक जखमी
एसीच्या कंप्रेसरमध्ये स्फोट झाल्याने घराला आग एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हरियाणातील बहादुरगडच्या सेक्टर 9 मध्ये ही घटना घडली.
पीडित कुटुंब बहादुरगड येथील सेक्टर 9 मधील घर क्रमांक 312 मध्ये भाड्याने राहत होते. शनिवारी सायंकाळी अचानक घरातील एसीच्या कंप्रेसरमध्ये स्फोट झाला आणि घराला आग लागली. यानंतर दुसरा स्फोट झाला आणि आग आणखी भडकली.
घराला आग लागल्याचे पाहताच शेजाऱ्यांनी धाव घेत एकाला घरातून बाहेर काढले. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने घरातील इतर सदस्यांना ते वाचवू शकले नाही. शेजाऱ्यांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List