राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळलेली, एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर टीका
जळगावात एका सरपंचाची निर्घृण हत्या झाली, त्यामुळ राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच एका मुलीची कुणी छेड काढली तर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असेही खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. कालच आमच्या इथे एका सरपंचाची निर्घृण हत्या झाली. राज्यात लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगावात एका मुलीची कुणी छेड काढली, तर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असेही खडसे म्हणाले.
आपल्या नातीची ज्यांनी छेड काढली त्यातील काही गुन्हेगार अद्याप सापडलेले नाही असे खडसे म्हणाले. पोलीस याबाबतीत हलगर्जीपणा करत आहेत, जळगाव जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की आता पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असेही खडसे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List