’60 वर्षांचा हिरो, हिरोईन 28ची…’ सिकंदरमधील सलमान-रश्मिकाची जोडी रुचली नाही, चाहत्यांकडून ट्रोल
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. ईदच्या निमित्ताने सिकंदर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र चित्रपट रिलीजआधीच सलमानवर चाहत्यांनी निशाणा साधला आहे. ‘सिकंदर’ मधील गोष्ट नेमकी काय आहे याबद्दल अद्याप तरी उलगडा झालेला नाही. पण या चित्रपटातील सलमान आणि रश्मिराच्या जोडीवरून आता चाहत्यांनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सलमान-रश्मिकाच्या जोडीवरून गोंधळ
दोघांच्याही वयावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात सलमान खानच्या वयाबद्दल मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सलमान या वर्षी 27 डिसेंबर रोजी त्याच्या वयाची साठी गाठेल. आणि सिकंदरमध्ये, तो दोन अभिनेत्रींसोबत काम करतोय एक अठ्ठावीस वर्षांची रश्मिका मंदान्ना आणि एकोणचाळीस वर्षांची काजल अग्रवाल. चित्रपटातील सलमानच्या व्यक्तिरेखेचा अद्याप उलगडा झालेला नाही. पण रिलीज झालेल्या सर्व गाण्यांमध्ये सलमान आणि रश्मिका यांच्यातील केमिस्ट्री दिसून येते. या केमिस्ट्रीमुळे आता सलमानच्या वयावरून चर्चा सुरु झाली आहे.
अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या वयातील अंतर महत्त्वाचं नाहीये का?
चाहत्यांचा आता असा प्रश्न असा आहे की 28 वर्षांची रश्मिका मंदाना 60 वर्षांच्या सलमान खानसोबत कशी दिसेल? दोन्ही कलाकारांच्या वयानुसार, रश्मिका मंदाना सलमान खानच्या वयाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आता चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या वयातील अंतरावर बोललं जातच नाही का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. याआधीही अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची जोडी पाहायला मिळाली आहे. ज्या जोडीत अभिनेत्याचे वय हे अभिनेत्रीच्या वयापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट होतं. आणि म्हणूनच आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, चित्रपटांमध्ये आता अभिनेत्रीचे वय आणि अभिनेत्याच्या वयातील अंतराचा काहीच फरक पडत नाही का?
सलमान आणि रश्मिका यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना रुचली नाही
दरम्यान चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज होत आहेत. सलमान रश्मिकाच्या जोडीला चाहते फारसी पसंती देताना दिसत नाहीये. तसेच या चित्रपटात काजल अग्रवालची भूमिका काय आहे, याबद्दलही चाहत्यांना उत्सुकता आहे.पण सलमानच्या वयानुसार त्याने खरंच रश्मिकाच्या हिरोची भूमिका करणं कितपत योग्य आहे असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List