प्रोटीन शेक प्यायला, 90 मिनिटे वर्कआऊट केलं; मग चेंजिंग रुममध्ये जाताच मृत्यू
वर्कआऊट केल्यानंतर 26 वर्षीय जिम ट्रेनरचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरात फिटनेस वन जिममध्ये ही घटना घडली. गणेश वर्मा असे मयत ट्रेनरचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
व्यायाम करण्यापूर्वी गणेश वर्मा प्रोटीन शेक प्यायला. त्यानंतर त्याने 90 मिनिटे व्यायाम केला. यानंतर तो चेंजिंग रुममध्ये कपडे बदलायला गेला. मात्र तो बराच वेळ बाहेर येईना म्हणून दुसऱ्या ट्रेनरने बाजूच्या खोलीतून वरुन पाहिले असता तो बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले.
जिममधील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने गणेशला रुममधून बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृताचा व्हिसेरा तपासणीसाठी घेण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List