‘तू खरंच संभाजी महाराज जगलास’; छावामधील लढाईचा सीन असा शूट झाला, सेटवरील विकीचा व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकाच्या मनावर या चित्रपटाने जणू राज्य केलं आहे. या चित्रपटाची क्रेझ कधीही कमी होणार नाही. हा चित्रपट तब्बल 500 कोटींच्या घरात गेला आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. प्रत्येकाने आपली भूमिका तेवढ्याच ताकदीने निभावली आहे.
दांडपट्टापासून ते लाठी-काठी प्रशिक्षणापर्यंत सगळं शिकवलं
विकी कौशलचं तर प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं आहे. त्यानंतर नकारात्मक भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाचंही प्रेक्षकांनी तेवढंच कौतुक केलं आहे. खरा खलनायक त्याने साकारला असंही प्रेक्षकांनी म्हटलं आहे. दिग्दर्शनाबद्दल लक्ष्मण उतेकरांचा सर्वांनाच अभिमान वाटतोय. त्यांनी ज्या ताकदीने हा सिनेमा बनवला त्याला खरंच तोड नाही. मुख्यम्हणजे त्यांनी कलाकारांची तेवढी तयारीही करून घेतली होती. विशेषत: विकी आणि इतक कलाकार जे लढाईच्या सीनमध्ये दिसणार आहेत. या सर्वांना सर्वप्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दांडपट्टापासून ते लाठी-काठी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही त्यांना शिकवण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक कलाकाराने तेवढी मेहनत घेतली आहे.
लढाईचे काही बारकावे शिकवण्यात आले
एवढंच नाही तर चित्रपटातील लढाईच्या प्रत्येक सीनद्वारेही कलाकाराला लढाईचे काही बारकावे शिकवण्यात आले. त्यात कोणतीही कसर लक्ष्मण उतेकरांनी सोडली नाही. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. दरम्यान या चित्रपटाचं देशभरात अनेक ठिकाणी चित्रीकरण पार पडलं असून मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्येही या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे.
तलवारी, काठी घेऊन कसे युद्धाच्या सीनचे शूटिंग
दरम्यान आता ‘छावा’ हा सिनेमा कसा तयार झाला, किंवा या चित्रपटातील लढाईचे सीन कसे आणि कुठे शूट झाले असे अनेक छोटे छोटे व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका लढाईचा सीन शूट होत आहे. तलवारी, काठी घेऊन कसे युद्धाच्या सीनचे शूटिंग सुरु असलेली दिसत आहे. तसेच सेटवर त्या सीन आधी विकिला हातात तलवार आणि ढाल घेऊन ते प्रशिक्षण दिलं जात आहे असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सेटवर हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे
Hanuman Nadate Vlogs, @Thehanumannadate या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लढाईच्या सेटवरचाच असून आपले मावळे, संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला विकी आणि मूघल सैनिक दिसत आहेत. नाही म्हटलं तरी हजारोंची गर्दी या सेटवर पाहायला मिळत आहे.
दरम्यान असाच एक व्हिडीओ छावा चित्रपटाची निर्माती केलेली कंपनी ‘मॅडॉक’नेही शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना विकी कौशललादेखील टॅग केले आहे. युद्धाच्या सीनचे शूटिंग करण्याआधी या विकी कौशलने नक्की काय व कशाप्रकारे तयारी केली, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. दरम्यान शुटींग दरम्यान अनेकदा विकीला दुखापतही झाली होती. पण त्याने तेवढ्याच जोशने आपली तयारी सुरुच ठेवली.
‘आम्हाला विकी कौशल दिसलाच नाही….’
हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत विकी कौशलचे कौतुक केले आहे. ‘भावा तू संभाजी महाराज जगला’, ‘तुझे कष्ट पडद्यावर दिसत आहेत’, “आम्हाला विकी कौशल दिसलाच नाही, आम्हाला फक्त छत्रपती संभाजी महाराज दिसले, हीच तुमच्या मेहनतीची खरी पोचपावती’, अशा अनेक कमेंट या चाहत्यांनी केल्या आहेत. विकी कौशलने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List