सलमानसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अबू आझमी कुटुंबाची सून कशी बनली? मुस्लीम धर्मही स्वीकारला

सलमानसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अबू आझमी कुटुंबाची सून कशी बनली? मुस्लीम धर्मही स्वीकारला

समाजवादी पक्षाचे आमदार अबू मत्यांच्या एका वक्तव्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. अधिवेशन होईपर्यंत त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. अबू आझमींनी औरंगजेबाचे कौतुक केल्यामुळे त्यांच्यावर सर्वांनीच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे., पण फक्त अबू आझमीच नाही तर त्यांचा मुलगा फरहान आझमीही अडचणीत आला आहे. गोव्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर गोव्यातील कॅन्डोलिम येथील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या वादावरून फरहानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयेशा टाकिया आझमी कुटुंबाची सून

वडील आणि मुलगा दोघेही जेव्हा अडचणीत सापडल्याने सून आणि बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया आता त्यांच्या बचावासाठी पुढे आली आहे. बॉलिवूडमधील एकेकाळी हिट नायिकांपैकी एक असलेली आयेशा टाकिया आझमी कुटुंबाची सून आहे. तिने अनेक सुरहीट चित्रपट दिले आहेत. त्यात तिचा सलमान खानसोबतचा वॉन्टेड हा चित्रपट तर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर आयेशाची क्रेझही वाढली.

तिची फॅनफॉलोइंगही वाढली. तिच्या लूक्सवरूनही चाहते तिच्या प्रेमात होते. पण तुम्हाला माहितीये का की आयेशा ही आझमी कुटुंबाची सून कशी बनली आणि ती हळूहळू बॉलिवूडपासून दूर गेली. पण आयेशा आझमी कुटुंबाची सून कशी बनली? आयशा आणि फरहान नक्की कुठे भेटले? याबद्दल, त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी जणांना माहित असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)


आयशा आणि फरहान नक्की कुठे भेटले?

आयशा टाकियाचा पती फरहान आझमी हा एक व्यावसायिक आहे. त्याच्याकडे अनेक रेस्टॉरंट्स आहेत. फरहानने कुलाब्यातील स्कॉलर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. आयेशा फरहानला त्याच्या मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये ती एकदा भेटली होती. आयेशाचे वडील आणि फरहानचे वडील एकमेकांना आधीच ओळखत होते.आयशा आणि फरहान यांच्या भेटींची वारंवारता वाढू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय बनली. त्या काळात आयशाने अनेक मुलाखतींमध्ये देखील फरहानबद्दल बऱ्याचदा विषय काढले होते. आयशाने अनेक मुलाखतींमध्ये फरहानचं कौतुक केलं होतं.

फरहानशी लग्न करण्यासाठी आयशा मुस्लिम झाली

फरहान आणि आयशा तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. आयशा आणि फरहानचे लग्न 2009 मध्ये झालं. लग्न करताना यासोबतच आयेशाने मुस्लीम धर्म स्वीकारला. तिने आपल्या नावापुढे आझमी हे नाव जोडलं. चार वर्षांनंतर, आयशा आणि फरहानने एका मुलाला जन्म दिला. आयेशा जेव्हा फरहानशी लग्न करत होती तेव्हा ती 23 वर्षांची होती. लग्नानंतर तिने खूप कमी चित्रपटांमध्ये काम केलंय.

आयशा शेवटची ‘मोड’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले होते. यामध्ये रणविजय सिंग, रघुबीर यादव, तन्वी आझमी आणि अनंत महादेवन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2011 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन ‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन
अनेकदा घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये मोबाईल किंवा अॅपवरुन खाद्यपदार्थ मागविण्यासाठी झोमॅटो हे लोकप्रिय ठरले. झोमॅटोद्वारे तुम्हाला तुमचे जेवण अगदी सहज घरपोच...
‘सौ सुनार की एक लोहार की’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीमुळे आता भाजप अडचणीत
अखेर समोर आलं तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण; जाणून धक्का बसेल
भाजप खासदार तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी
राम गोपाल वर्मांची सुटका नाही? न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
जर तुमचंही शरीर देत असेल ‘हे’ पाच संकेत; तर समजू जा किडनी खराब झालीये
हा ‘साबण’ नेमका आला कुठून ? ४ मोठे फायदे व तोटे एकदा नक्की वाचा