शिवजयंतीदिनी ‘छावा’ला मोठा झटका; विकी कौशलची जादू ओसरली?

शिवजयंतीदिनी ‘छावा’ला मोठा झटका; विकी कौशलची जादू ओसरली?

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ या चित्रपटाची शिवजयंतीच्या दिवशी फार कमी कमाई झाली. सोमवारी तिथीनुसार छत्रपती शिवाज महाराजांची जयंती होती. यादिवशी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने फक्त 2.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ही आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई होती. ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिना उलटूनही थिएटरमध्ये त्याची कमाई सुरूच आहे.

पाचव्या आठवड्यात ‘छावा’ने एकूण 22 कोटी रुपये कमावले आहेत. पाचव्या आठवड्याच्या कमाईच्या बाबतीत विकी कौशलच्या ‘छावा’ने ‘स्त्री 2’ (16 कोटी), ‘पुष्पा 2’ (हिंदीत 14 कोटी) यांना मागे टाकलं आहे. मात्र पाचव्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत बरीच घट पहायला मिळाली. कारण त्या तुलनेत पहिल्या आठवड्यात 24 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 18 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 7.75 कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात 5.25 कोटी रुपये इतकी कमाई झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने भारतात केवळ 23 दिवसांत कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 700 कोटींच्या पार आहे. ‘छावा’ हा विकी कौशलच्या करिअरमधील आणि 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘छावा’च्या कमाईचे महत्त्वपूर्ण मुद्दे-

  • पहिल्या आठवड्यात ‘छावा’ची एकूण कमाई 219.25 कोटी रुपये इतकी होती
  • दुसऱ्या आठवड्यात ‘छावा’ने 180.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता
  • तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपयांची कमाई झाली
  • चौथ्या आठवड्यात ‘छावा’ने 55.95 कोटी रुपये कमावले
  • प्रदर्शनाच्या 29 व्या दिवशी चित्रपटाने 7.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला
  • प्रदर्शनाच्या तिसाव्या दिवशी 7.9 कोटी रुपयांची कमाई झाली
  • 31 व्या दिवशी कमाईचा आकडा 8 कोटींवर पोहोचला

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार राजकीय हवा तापली असली तरी राज्यातील पारा घसरणार? उन्हाच्या काहीलीतून होणार सुटका, हलक्या सरी कोसळणार
राज्यात गेले काही दिवस नैसर्गिक आणि राजकीय तापमान वाढले आहे. मात्र, येत्या काही दिवसात तापमान घटणार असून काही ठिकाणी हलक्या...
पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल, अशी शिक्षा देणार…नागपुरात हिंसाचार करणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा
औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; उदयनराजे भोसले कडाडले
महागड्या हॉटेलमध्ये मजा केली; अभिषेक बच्चनचा ४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबतचा फोटो पाहून नेटकऱ्याने केली कमेंट
औरंगजेब कबरीमुळे राज्यात तणावपूर्ण वातावरण, मराठी गायक म्हणाला, आपल्याला शत्रुची गरज नाही कारण…
“ममता कुलकर्णीने इस्लाम धर्म स्विकारला असता तर वाद झाले असते?”, लक्ष्मी नारायण त्रिपाठींचे खळबळजनक विधान
बदलत्या हवामानात लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खायला देऊ नका, तज्ज्ञांकडून जाणून घ्या