‘छावा’नंतर संतोष जुवेकरची फॅनफॉलोइंग अन् क्रेझ वाढली, गोव्याच्या स्टारबक्समध्ये मिळालं खास सरप्राइज
सध्या सर्वत्र फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. सर्वांच्याच ओठांवर फक्त ‘छावा’च नाव आहे. ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून अभिनेता विकी कौशलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. तसेच या चित्रपटातील इतर कलाकारांचेही तेवढेच कौतुक होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात छावा चित्रपटात रायाजीच्या भूमिका साकारलेला अभिनेता संतोष जुवेकरचंही सर्वत्र कौतुक होत आहे.
छावा’मुळे संतोषचं फॅन फॉलोविंग आणि क्रेझ वाढली
‘छावा’मुळे संतोषचं फॅन फॉलोविंग आणि क्रेझ चांगलीच वाढली आहे. संतोषला ‘छावा’ सिनेमामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्याच्या मुलाखतींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्याने त्याला मिळालेल्या रायाच्या भूमिकेपासून ते विकीसोबत वाढलेल्या मैत्रीबद्दलही त्याने सर्वकाही सांगितलं.
गोव्याच्या एअरपोर्टवर संतोषला खास सरप्राइज
अनेकदा त्याच्या या मुलाखतींबद्दल त्याचं कौतुकही झालं आणि अनेकदा ट्रोलही करण्यात आलं. पण छावामुळे त्याची क्रेझ आणि चर्चा वाढलीये एवढं नक्की. नुकताच संतोष गोव्याला गेला होता. तिथे गोव्याच्या एअरपोर्टवर त्याला चाहत्यांकडून खास सरप्राइज मिळालं. एअरपोर्टवरील स्टारबक्समधील कर्मचाऱ्यांनी संतोषला पाहताच त्याला खास सरप्राइज दिलं. छोटासा केक देऊन त्यांनी संतोषला खास सरप्राइज दिलं आहे. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.
सरप्राइज बघून संतोष भारावला
चाहत्यांनी दिलेलं हे सरप्राइज बघून संतोषच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्ट दिसत आहे. संतोष त्यांना “तुम्ही ‘छावा’ पाहिला का?” असं विचारतो. त्यावर ते चाहते “हो, आणि सिनेमात तुम्हाला बघून आनंद झाला” असं म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत संतोषने चाहत्यांचे आभार मानले आहेत. “Thank u so much मित्रांनो, खूप खूप प्रेम तुम्हांला…ही खरी कमाई”, असं संतोषने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, ‘छावा’ सिनेमा 500 कोटींच्या घरात गेला आहे. या चित्रपटाची क्रेझ वाढतच चालली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List