शेवंतीच्या शेतात एलईडीचा झगमगाट, जेऊरमधील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

शेवंतीच्या शेतात एलईडीचा झगमगाट, जेऊरमधील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

जेऊर येथील बहिरवाडीतील तरुण शेतकरी संतोष दारकुंडे यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात शेवंतीचे पीक घेतले आहे. फुलोऱ्यात आलेल्या या पिकाचा थंडीपासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी शेतात 200 एलईडी बल्ब लावले आहेत. एलईडीचा झगमगाट रात्री लक्ष वेधून घेत आहे.

थंडीच्या दिवसांत या फुलांच्या वाढीसाठी प्रकाशाची गरज असते. त्यामुळे या तरुण शेतकऱ्याने अर्ध्या एकरात 200 एलईडी बल्ब लावून पिकाची जोपासना केली. रोपांच्या वाढीसाठी बल्बच्या माध्यमातून प्रकाश देण्याचा जिल्ह्यातील हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा.

भरपूर सूर्यप्रकाश लागत असल्याने शेवंतीची लागवड मार्च-एप्रिलमध्ये केली जाते. त्यामुळे त्यास उन्हाळ्यातील पीक म्हटले जाते. थंडीत रात्र मोठी व दिवस छोटा यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव आणि थंडीची बाधा यामुळे रोपांची वाढ होत नाही. या अडचणीवर उपाय म्हणून बल्पचा प्रयोग केला आहे.

याबाबत बोलताना दारकुंडे म्हणाले, ‘मार्चमध्ये शेवंती फुलाची कमतरता जाणवते. ती चार महिने राहते. यासाठी आम्ही आमच्या गुलाब शेतीत आंतरपीक म्हणून ‘बिजली’ या पांढऱ्या शेवंतीची नोव्हेंबरमध्ये लागवड केली. रोपांच्या वाढीसाठी प्रकाशाची ऊब देण्याचा प्रयोग केला. अर्ध्या एकरात केबल अंथरून 200 एलईडी बल्ब लावले. यासाठी 40 हजार खर्च आला. आता या प्रयोगाचा चांगला परिणाम दिसून शेवंतीच्या रोपांची झपाट्याने वाढ झाली आहे.’

‘ही शेवंती बिगरहंगामी आहे. तिला फूल येण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात फुले सुरू होतील. या वेळेस बाजारात पांढरी शेवंती फूल मिळत नाही. यामधून आम्हाला खर्च वजा जाता, अंदाजे सात लाख रुपये उत्पन्न मिळेल,’ असे ते म्हणाले, रात्रीच्या वेळी अंधारात चमकणाऱ्या या एलईडी बल्बचा झगमगाट पाहून कुतूहलाने अनेक शेतकरी शेती पाहायला येतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले “ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले
बॉलिवूड सेलिब्रिटींना चाहत्यांमुळे अनेकदा समस्यांना तोंड द्यावं लागतं. फॅन्सबाबतचे बरेच विचित्र किस्से सेलिब्रिटींसोबत घडत असतात. असाच एक किस्सा आलियासोबतही घडला....
‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे..; किरण मानेंजी जोरदार टीका
Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या ‘त्या’ कवीता, नक्कीच वाचा
म्हणून ‘या’ मराठी कलाकाराने नाकारली “छावा” चित्रपटातील ती भूमिका; Video होतोय प्रचंड व्हायरल
‘छावा’ सिनेमा, गणोजींच्या भूमिकेत दिसलेला सारंग साठ्ये म्हणतो, ‘लोकं मारायला निघालेत कारण…’
Pune Crime News – स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपीचा शोध सुरू
ड्रायफ्रूटस् भिजवून खा, शरीराला मिळतील खूप सारी पोषकतत्वे आणि भरपूर फायदे