घटस्फोटापूर्वी धनश्री वर्माने उर्फीशी साधला होता संवाद, अभिनेत्रीचा चकीत करणारा खुलासा
अभिनेत्री आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माने नुकताच भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल याला घटस्फोट दिला. लग्नाच्या चार वर्षानंतर लगेच धनश्री आणि युजवेंद्र यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या तेव्हा बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने यावर वक्तव्य केले होते. तिने धनश्रीने घटस्फोटापूर्वी संवाद साधल्याचे सांगितले.
उर्फी जावेदने सोशल मीडियावर धनश्रीला तिच्या वाईट काळात पाठिंबा देत पोस्ट केली होती. यानंतर धनश्रीने उर्फी जावेदशी संपर्क साधून आभार मानले. खुद्द उर्फीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. धनश्रीच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यावर धनश्रीची प्रतिक्रिया काय होती हे तिने सांगितले.
उर्फीच्या पोस्टवर धनश्री काय म्हणाली?
उर्फी जावेदने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीदरम्यान सूत्रसंचालकाने चहल आणि धनश्रीच्या नात्याचा उल्लेख करत ‘नेहमीत धनश्रीच्या पोस्टवर वाईट कमेंट केल्या जातात’ असे म्हटले. त्यावर उर्फीने उत्तर देत म्हटले की, दोन लोकांमधील नातेसंबंधात केवळ स्त्रीलाच कसे टार्गेट केले जाते आणि तेही जेव्हा तिच्यासमोर एक पुरुष खेळाडू असतो. त्यामुळे स्त्रीला खलनायक मानले जाते. उर्फीने मुलाखतीत सांगितले की, “मी तिच्यासाठी (धनाश्री) एक कथा शेअर केली होती. यानंतर तिने माझे आभार मानले. मला तेव्हा तिच्यासोबत काही तरी चूकीचे घडत आहे याची जाणीव झाली. ती खूप कठीण काळातून जात होती.”
पुरुष क्रिकेटपटूंच्या घटस्फोट किंवा ब्रेकअपच्या वेळी लोक फक्त महिलांना टार्गेट करत असल्याने म्हणत उर्फी जावेदने संताप व्यक्त केला आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले होते की, जेव्हा जेव्हा क्रिकेटरचा घटस्फोट किंवा ब्रेकअप होते तेव्हा महिलेला वाईट मानले जाते. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचच्या बाबतीतही असेच घडले आहे. लोकांना माहिती देखील नसते की त्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे? विराट कोहलीच्या खराब कामगिरीसाठी अनुष्का शर्मालाही जबाबदार धरण्यात येते. पुरुषाच्या कामासाठी नेहमीच स्त्रीला का दोषी ठरवले जाते?
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List