तरुणीनं आरडा ओरड केली म्हणून ग्रामस्थ धावून आले, तरुणाचा मोबाईल पाहून हादरले; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

तरुणीनं आरडा ओरड केली म्हणून ग्रामस्थ धावून आले, तरुणाचा मोबाईल पाहून हादरले; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

आज देशभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे काही घटना अशा देखील समोर आल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात संताप आहे.  आज पुण्यामध्ये सकाळी एका तरुणानं दारूच्या नशेत रस्त्यावरून जाणाऱ्या -येणाऱ्या महिलांसमोरच अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कल्याणच्या खडकपाडा बारावे परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे.

महिलांचे फोटो काढणाऱ्या विकृताला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. कल्याणच्या खडकपाडा बारावे परिसरात ही घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास एका मुलीनं आरडा-ओरड करत या तरुणावर फोटो काढत असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर ग्रामस्थानी या तरुणाला पकडं, त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये गावातील अनेक महिला आणि मुलींचे फोटो असल्याचं समोर आलं आहे.

रुपेश कोयते असं या विकृत व्यक्तीचं नाव असून, गेल्या वर्षभरापासून तो या गावात भाड्याच्या रूममध्ये राहात असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थानी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे.  खडकपाडा पोलिसांनी आरोपी रुपेश कोयतेला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान पुण्यामध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये एका तरुणीच्या शेजारी बसलेल्या 41 वर्षांच्या व्यक्तीनं अश्लिल कृत्य केल्याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना पाच मार्च रोजी सातारा -कात्रज बस प्रवासादरम्यान घडली होती. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण ताज असतानाच आता कल्याणमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मुलींचे फोटो सापडले आहेत. गावकऱ्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kunal Kamra Controversy – काट डालेंगे तुम्हें! ‘गद्दार’ गीताने मिंधेंना चोपणाऱ्या कुणाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन Kunal Kamra Controversy – काट डालेंगे तुम्हें! ‘गद्दार’ गीताने मिंधेंना चोपणाऱ्या कुणाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन
स्टँड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने ‘गद्दार’ गीतामधून मिंधेंना झोडपून काढले. हे ‘गद्दार’ गीत झोंपल्याने मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी खार येथील ‘हॅबिटेट’...
नासामध्येही कर्मचारी कपात; शास्त्रज्ञ, इंजिनीअर्सना लागली भविष्याची चिंता
लग्न केल्याने पत्नीचे मालक होत नाही; अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यावरून अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे
Mehul Choksi मेहूल चोक्सी आमच्याच देशात, बेल्जियमने दिली कबूली
‘हसीन दिलरुबा’ पाहून रचला कट
आयपीएल राऊंडअप – आवेश खान येतोय…
लक्षवेधक – ऑर्डरनंतर आयफोन 10 मिनिटांत घरी