धनंजय मुंडेंविरुद्ध, स्ट्राँग मुंडेंची गरज, अंजली दमानिया यांनी सुचवले हे नाव, कोण आहे ही डॅशिंग व्यक्ती?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मराठवाड्यातील सामाजिक, राजकीय समीकरणं बदलली आहे. त्यातील विविध पदर आणि संघर्ष उफाळला असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बदलत्या मराठवाड्याचा संदर्भ देत त्यांनी मुंडेंविरोधात स्ट्राँग मुंडे देण्याची मागणी केली आहे. त्यांनी त्यासाठी या डॅशिंग अधिकाऱ्याचे नाव सुद्धा सुचवले आहेत. कोण आहेत हे अधिकारी? काय म्हणाल्या दमानिया?
आता हवा स्ट्राँग मुंडे
मराठवाड्याला आता कोणी खूप स्ट्राँग व्यक्ती देण्याची गरज आहे. कोणाचेही न ऐकणारा असा व्यक्ती हवा आहे. मला असं वाटतं मुंडे विरुद्ध मुंडे करण्याच्या आता मराठवाड्याला गरज आहे. आणि तुकाराम मुंडे यांना समजा आपण डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त म्हणून शासनाने तिथे पाठवलं तर त्यांच्यासारखा स्ट्राँग ऑफिसर आणि स्ट्राँग व्यक्तिमत्वाची आता महाराष्ट्राला गरज आहे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली. त्यांच्या या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार याची चर्चा होत आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांची राळ
माझ्याकडे रोज इतकी प्रकरण येतायेत, इतके मेसेजेस येतात, इतके व्हिडिओज येतात की बघून बघून मला थकायला होतंय.रात्री झोप लागत नाहीये.. धनंजय मुंडे आणि विरोधात कृषी घोटाळ्याची मालिकाच आहे. त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढलं होतं. कृषी घोटाळा काढला होता. एक सामाजिक न्याय मंत्री असतानाचे त्यांचे व्हिडिओज बाहेर येत असल्याचे दमानिया म्हणाल्या.
त्यांच्याकडे टोळ्या
बीडमधील राजकीय दहशतीवर त्यांनी भाष्य केले. दहशत करणारे लोक आहेत. प्रत्येकाचे आपापले कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या आपल्या टोळी आहे. त्यांनी यावेळी जिल्ह्यातील प्रमुख सर्वच राजकीय नेत्यांची नावे घेत, त्यांच्याकडे टोळ्यांचे राज्य असल्याची टीका केली. कुठून किती निधी आणायचा, त्यातील टक्केवारी यावर या टोळ्या काम करतात, असे त्या म्हणाल्या. प्रशासकीय यंत्रणेत डॅशिंग ऑफिसर आणायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.
भोसले माध्यमांना सापडतो, पोलिसांना नाही
हम नही सुधरेंगे, अशी टीका दमानिया यांनी बीड पोलिसांवर केली.सतीश भोसले हा फरार आहे. तो माध्यमांना मिळतो पण तो पोलिसांना मिळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. पोलीस अधिक्षकांनी चॅनलवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांवर कारवाई करावी असा टोला दमानिया यांनी लगावला. आमदार प्रकाश सोळंके यांच्या कथित कार्यकर्त्याने मारहाण केल्याप्रकरणात त्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी दमानिया यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List