Pune news – साखरझोपेतच कुटुंबीयांवर बिबट्याचे संकट; पडक्या भिंतीवरून पडला घरात; तरुणाची 10 मिनिटे झुंज

Pune news – साखरझोपेतच कुटुंबीयांवर बिबट्याचे संकट; पडक्या भिंतीवरून पडला घरात; तरुणाची 10 मिनिटे झुंज

कुत्र्याचा पाठलाग करीत असताना एक बिबट्या पडक्या घरातील भिंतीवरून खाली पडला. साखरझोपेत असलेल्या घरातील व्यक्ती या घटनेमुळे काहीशा भांबावल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे जुन्नर तालुक्यात घडली. या वेळी आईच्या उशाला बिबट्या पडल्याचे पाहून मुलाने बिबट्याशी झुंज करीत त्याला घरातून पिटाळले, म्हणून पुढील अनर्थ टळला.

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशीच ही जीवाचा थरकाप उडविणारी घटना वडज गावात घडली.

आकाश मीननाथ चव्हाण (वय -25) हा युवक वडज येथील गावठाणात पत्नी व आई यांच्यासोबत साधारण पडक्या घरात राहतो. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या कुत्र्याच्या शिकारीच्या आशेने घराजवळ आला. बिबट्याची चाहूल लागल्यावर कुत्र्याची पिले पडक्या भिंतीवर चढली. बिबट्याही त्यांच्यापाठोपाठ घराच्या पडक्या भिंतीवर चढला. कुत्र्याची पिले भिंतीवरून खाली उतरण्यात यशस्वी झाली. मात्र, या पडक्या भिंतीवरून बिबट्या थेट घरात पडला.

बिबट्या जेथे पडला, तेथे आकाशची आई सविता चव्हाण व बाजूला पत्नी आरती चव्हाण झोपली होती. यावेळी आकाश टीव्ही पाहत होता.

अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने आई घाबरली. आपल्या घराची भिंतच पडली असे तिला वाटले. मात्र, भिंत पडली नाही तर घरात बिबट्या आलाय. हे तिच्या लक्षात आले. आईने पांघरलेल्या गोधडीतूनच मुलाला आवाज दिला. आकाश त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र तो बाहेर न जाता घराच्या तुळईवर जाऊन बसला. तिथून त्याला आकाशने हुसकविण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट आकाशच्या अंगावर झेप घेतली व त्याच्यावर हल्ला केला. त्याचे दोन्ही हात बिबट्याच्या जबड्यात गेले. घरातील माहिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पुन्हा तुळईवर जाऊन बसला. आकाशने तातडीने दरवाजा उघडून आई व पत्नीला बाहेर काढले व स्वतः काठी घेऊन बिबट्याला हुसकू लागला. बिबट्याने पुन्हा आकाशवर झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्या व आकाश यांच्यात सुमारे दहा मिनिटे झटापट झाली. आकाशच्या हाताला बिबट्याचे दात लागले. आकाशच्या काठीचा फटका बिबट्याला जोरात लागल्याने बिबट्या बाहेर पळाला.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच वनविभागचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, वनपाल नितीन विधाटे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले व आकाश चव्हाणला जुन्नरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. आमदार शरद सोनवणे यांच्या पत्नी सीमा सोनवणे यांनीदेखील दवाखान्यात जाऊन आकाश चव्हाण यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वडजचे सरपंच सुनील चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी चव्हाण कुटुंबाला मोठा धीर दिला. आकाश चव्हाण यांचे पडके घर असून त्याला घर बांधून देऊ, असे सरपंच सुनील चव्हाण यांनी सांगितले.

आकाश चव्हाण या युवकाने धाडस दाखवून बिबट्याला घरामधून पिटाळून लावले व आई, पत्नी व स्वतःचा जीव वाचवला, त्याचे ह्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात