Chandrapur News – बिअर बारसमोर टोळक्याच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बिअर बारसमोर युवकांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दिलीप चव्हाण (36) असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तर समीर चापले (34) असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
चंद्रपूर शहरातील पठाणपुरा मार्गावरील पिंक बारसमोर किरकोळ वादातून युवकांच्या टोळीने धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि परिसरात मोठा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, घटनेची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक करीत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List