अजय अशर आणि त्याचे राजकीय ‘आका’ ईडीची फिट केस, फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत यांचा शिंदेंवर घणाघात

अजय अशर आणि त्याचे राजकीय ‘आका’ ईडीची फिट केस, फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत यांचा शिंदेंवर घणाघात

महायुतीत सर्व सुरळीत आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज नवीन धक्के दिले जात आहेत. शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची उचलबांगडीची बातमी ताजी असतानाच आता त्यांनी ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून शिंदेंनी नेमलेल्या अजय अशर याची हकालपट्टी केली आणि प्रवीण परदेशी यांची नेमणूक केली. या निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत यांनी अजय अशर आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केला.

अजय बिशर हा ठाण्यातला बिल्डर होता आणि त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत. एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाणाहार, त्यांच्या जमिनीचे व्यवहार करणार आणि त्यांच्या पैशाचा संरक्षक म्हणून अजय अशरची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा आणि आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पैशांची ही देवाणघेवाण करण्यामध्ये अजय अशर, सूरतचे भाजप खासदार आणि इतर काही ठेकेदार होते, या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अजय अशर याने हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळी केली. त्याने देशही सोडलेला आहे. निरव मोदी, विजय मल्ल्यासह अनेक लोक देश सोडून पळाले आणि आता अजय अशरही पळाला. तहव्वूर राणाला परत आणण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. पण मोदी, मल्ल्या, अशर हे आर्थिक क्षेत्रातील दहशतवादी आहेत, त्यांना कधी परत आणणार?

माजी मुख्यमंत्र्यांसाठी त्याने कुठे आणि कसा पैसा गोळा केला यासाठी त्याची अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. किमान 10 हजारकोटी घेऊन अजय अशर हा परदेशात स्थायिक व्हायला गेला आहे. त्याच्याकडे सध्याच्या सरकारमधील अनेकांनी पैसे गुंतवले आहे. फडणवीस यांनी ‘मित्र’ संघटनेवरून अजय अशरला दूर करून चांगला अधिकारी नेमला तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असेरी राऊत म्हणाले.

शिंदेंना फडणवीसांचे धक्क्यावर धक्के; एमएसआरडीसीत मिंध्यांनी नेमलेल्या कैलास जाधवांना हटवले, कमळ कोटय़ातील वैदेही रानडे यांना आणले

अशा लोकांवर ईडीची कारवाई होत नाही का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, अजय अशर आणि त्याचे ‘आका’ ही ईडीची फिट केस आहे. ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृहमंत्रालयाने अजय अशरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण पैशाच्या बाबतीत सगळ्यांची ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ ही भूमिका असते.

फडणवीस यांनी सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेतून शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का असे विचारले असता राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. ते फक्त बेडुक उड्या मारायचे. पंख असलेला माणूस गरूड झेप घेतो, अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे, असे राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग