सैफ अली खान – करीना कपूर यांचा दीड वर्षात होणार घटस्फोट? ‘हा’ आहे पुरावा
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडच्या पॉव्हर कपल पैकी एका आहेत. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर करीना आणि सैफ यांनी जगात दोन मुलाचं स्वागत केलं. आज करीना पती सैफ आणि दोन मुलांसोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगत आहे. पण समोर येत असलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये करीना आणि सैफ यांचा घटस्फोट होणार असल्याचं समोर येक आहे.
एक ज्योतिषी सुशील कुमार सिंह (Astrloger Sushil Kumaar Singh) यांनी सैफ आणि करीना यांचा घटस्फोट होणार असल्याचा दावा केला आहे. मुलाखतीत सुशील कुमार सिंह म्हणाले, ‘ही सैफ आणि करीना यांची कुंडली आहे. माझा 2010 चा पूर्वानुमान आहे. मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, हे लग्न फार काळ टिकणार नाही. घटस्फोटाचं कारण घरातील काही कारण असू शकतं. हे प्रकरण मिटणार नाही आणि पुढील दीड वर्षात करीना – सैफ यांचा घटस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
पुढे सुशील कुमार सिंह म्हणाले, ‘मी ठामपणे सांगू शकतो. हा दावा थक्क करणारा आहे. कारण बॉलिवूडमधील यशस्वी लग्न म्हणून सैफ आणि करीना यांच्याकडे पाहिलं जातं…’ असं देखील सिंह म्हणाले. यावर करीना आणि सैफ यांनी कोणतंच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
सैफ आणि करीना यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये सैफ आणि करीना यांनी लग्न केलं. फार साध्या पद्धतील दोघांनी लग्न उरकलं. दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. लग्नानंतर करीना हिने तैमूर आमि जेह यांना जन्म दिला.
करीना हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी सैफ अली खान याने अभिनेत्री अमृता सिंह हिच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर अमृता हिने सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांना जन्म दिला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List