‘राजीनामा द्या…’ फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, या फोटोमुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट आहे. त्यानंतर अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कालच धनंजय मुंडे यांंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची अर्धा तास बैठक पार पडली. ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी पोहचले होते, आणि त्यानंतर या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची कानउघाडनी देखील करण्यात आली होती अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. प्रारंभीपासूनच देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र धनंजय मुंडे यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज आपला राजीनामा दिला आहे, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे.
राज्यात संतापाची लाट
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. आरोपींनी अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली. हे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List