ज्ञानेशकुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

ज्ञानेशकुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

देशाचे 27वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 जानेवारी 2029 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. त्याबाबत कायदा मंत्रालयाकडून रात्री उशिरा अधिसूचना जारी करण्यात आली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे उद्या निवृत्त होत असून 19 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारणार आहेत.

ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरच्या 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांची गेल्या वर्षी मार्चमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. या बैठकीत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांच्यासह पाच नावे ठेवण्यात आली होती. त्याला राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. मात्र, बहुमताने ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींकडे हे नाव पाठवण्यात आले.

सरकारला निवडणूक प्रक्रियेवर कंट्रोल हवाय

निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरकारने सरन्यायाधीशांना वगळले आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट सांगावे, त्यांना निवडणुकांवर कंट्रोल हवाय. त्यांना निवडणूक आयोगाची विश्वासार्हता जपायची नाही, अशा शब्दांत आज काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

राहुल गांधींचा आक्षेप

बैठकीनंतर राहुल गांधी यानी एक असमहती दर्शवणारे पत्र जारी केले. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ही बैठकच व्हायला नको होती, असे राहुल गांधी पत्रात नमुद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजीनामा द्या…’ फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर ‘राजीनामा द्या…’ फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, या फोटोमुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट आहे. त्यानंतर अखेर आज मंत्री...
Pune-Mumbai: मुंबई-पुणे प्रवास सुपरफास्ट, विमानाच्या नव्हे रेल्वेच्या या प्रकल्पानंतर केवळ 25 मिनिटांत प्रवास
मुंडेंच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, सरकारला थेट सवाल, म्हणाले…
मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते, पण ते…
लग्नाच्या २२ वर्षांनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोडला संसार, स्वत: केला खुलासा
कोंड्यापासून मुक्ती हवीये ? त्वरित करा हे उपाय
चिकन, मटन, अंड्यापेक्षा शक्तीशाली या डाळी, व्हिटॅमिन्स-प्रोटीन इतके मिळणार की विसरणार नॉनव्हेज