विकी कौशलच्या ‘त्या’ 4 मोठ्या चुका आणि अभिनेत्याचं तब्बल 1600 कोटींचं नुकसान
Chhaava Actor Vicky Kaushal: आज ‘छावा’ सिनेमामुळे अभिनेता विकी कौशल याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमा 100 कोटींचा गल्ला जमा करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत सिनेमाने 72 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, विकीच्या 10 वर्षांच्या करीयरमधील ‘छावा’ पहिला सिनेमा सुपरहीट ठरला आहे. याआधी विकी कौशल स्टारर ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक ‘ सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर हीट ठरला. सिनेमाने तब्बल 250 कोटींचा गल्ला जमा केला.
पण विकीच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे की, अभिनेत्याने अशा 4 चुका केल्या आहेत, विकीला प्रचंड महागात पडल्या. असे चार सिनेमे जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. पण कधी नशिबाने दिलेला धोका, तर कधी स्वतःच्या निर्णयामुळे विकी त्या चार सिनेमांमध्ये झळकला नाही. तर आता जाणून घेऊ त्या चार सिनेमांबद्दल ज्यांच्यानुळे विकी यापूर्वीच सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाला असता…
अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जब तक है जान’ सिनेमाने जगभरात 235.7 कोटींचा गल्ला जमा केला. रिपोर्टनुसार, सिनेमासाठी विकीने शाहरुखच्या मित्राच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं, पण अभिनेत्याला ती भूमिका मिळाली नाही आणि ही भूमिका शारिब हाश्मीकडे गेली.
विकी कौशलला अभिनेता रणवीर सिंगच्या 83 सिनेमा मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ती नाकारली. 2021 मध्ये या सिनेमाने जगभरात 193.73 कोटी रुपयांची कमाई केली होती.
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमासाठी विकी याने ऑडिशन देखील दिलं होतं. पण सिनेमा अभिनेत्याच्या हाती लागला नाही. सिनेमाने जगभरात 169.96 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘स्त्री’ सिनेमासाठी देखील विकी याला सिनेमा ऑफर करण्यात आला होता. पण विकीने सिनेमासाठी नकार दिला आणि अभिनेता राजकुमार याची सिनेमात वर्णी लागली. सिनेमाच्या पहिल्या भागाने 180.76 कोटी कमावले. तर दुसऱ्या भागाने 874.58 कोटी रुपयांची कमाई केली होती.
वरील 4 सिनेमांमध्ये विकी झळकला असता तर, अभिनेत्याच्या नावावर आणखी चार हीट सिनेमे असते. रिपोर्टनुसार, वर नमूद केलेल्या प्रत्येक सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन एकत्र केलं तर त्याची कमाई 1654.73 कोटी रुपये होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List