‘ही ओव्हरस्मार्ट पिढी..’; समय रैनाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं

‘ही ओव्हरस्मार्ट पिढी..’; समय रैनाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडामध्ये टिप्पणी केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉमेडियन समय रैनाला कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर आपल्या शोमध्ये चर्चा केल्याबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी समय रैनावर टीका केली. त्याचप्रमाणे न्यायालयाला हलक्यात न घेण्याचा त्याला इशारा दिला. “ही तरुण पिढी स्वत:ला फार ओव्हरस्मार्ट समजते. त्यांना वाटतं की आम्ही आऊटडेटेड आहोत. परंतु त्यांच्याशी कसं वागायचं हे आम्हाला माहीत आहे. न्यायालयाला हलक्यात घेऊ नका”, असं न्यायमूर्ती सूर्यकांत सुनावणीदरम्यान म्हणाले. गेल्या महिन्यात समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी समय आणि रणवीरविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले होते.

पालकांबद्दल अश्लील प्रश्न विचारलेल्या रणवीर, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्वा मखिजा आणि इतरांविरुद्ध देशभरात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. तेव्हापासून समय कॅनडामध्येच आहे. तिथे त्याचे शोज आयोजित करण्यात आले आहेत. त्यातील एका शोदरम्यान समयने या वादावर टिप्पणी केली होती. माझ्या वकिलाची फी भरल्याबद्दल धन्यवाद, असं तो शोच्या सुरुवातीला प्रेक्षकांना म्हणाला. इतकंच नव्हे तर “या शोमध्ये अशा बऱ्याच संधी येतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप काही हास्यास्पद बोलू शकतो. पण तेव्हा ‘बीअर बायसेप्स’ला (रणवीर अलाहबादिया) आठवा भावांनो”, अशीही उपरोधिक टिप्पणी समयने केली होती. नंतर शो संपताना तो म्हणाला, “शायद समय खराब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ”, (कदाचित माझी वेळ वाईट सुरू आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, मीच वेळ आहे.) यावरूनच आता सुप्रीम कोर्टाने त्याला फटकारलं आहे.

समय रैनाचं नाव न घेता कोर्टाने म्हटलं, “त्यातला एक जण कॅनडाला गेला आणि तिथे तो याबद्दल बोलत होता. ही तरुण पिढी स्वत:ला अतिहुशार समजतेय. आमची पिढी जुनी झाल्याचं त्यांना वाटतंय. याप्रकरणातला एक जण कॅनडाला गेला आणि तिथे त्याने वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांना हे माहीत नाही की या न्यायालयाकडे कोणते अधिकार क्षेत्र आहे आणि काय करता येईल. आम्हाला ते नको आहे कारण ते तरुण आहेत हे आम्ही समजतो.”

दरम्यान सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहबादियाला दिलासा दिला आहे. रणवीरला त्याचं पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. मात्र ते नैतिकता आणि सभ्यतेच्या सामान्य मानकांचं उल्लंघन करणार नाही, याची खात्री करण्यास सांगितलं आहे. “सध्या याचिकाकर्त्यांना कोणतेही कार्यक्रम प्रसारित करण्यापासून रोखण्यात आलं आहे. जर याचिकाकर्त्याने असं प्रतिज्ञापत्र सादर केलं की त्याचे पॉडकास्ट शोज नैतिकता आणि सभ्यतेचं पालन करतती, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक तते पाहू शकतील, तर याचिकाकर्त्याला रणवीर शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी आहे”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

न्यायालयाने यापूर्वी रणवीरला अनेक अटींवर अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. ज्यामध्ये तो कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही या अटीचाही समावेश होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं...
विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप
MP Sanjay Raut News : ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
शक्ती कपूरवर आली मुंबईतील घर विकण्याची वेळ, काय आहे नेमकं कारण?
‘तारक मेहता..’मधील अय्यर खऱ्या आयुष्यात आजही सिंगल; लग्नाबद्दल म्हणाला..
31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा