आंतर रुग्णालय टी-20 क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल अंतिम फेरीत
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे सुरु झालेल्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-20 क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने अंतिम फेरीत प्रवेश केला. कप्तान प्रदीप क्षीरसागर, मनोज कांबळे व प्रफुल मारू यांच्या आक्रमक खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने जे.जे. हॉस्पिटलचा 3 विकेटने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
निम्मा संघ 41 धावांत गुंडाळून सामन्यावर वर्चस्व राखणाऱ्या जे.जे. हॉस्पिटलला अखेर पराभवास सामोरे जावे लागले. फिरकी गोलंदाज प्रफुल मारूने सामनावीर व अष्टपैलू रोहित सोळंकीने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार एमआयजीचे सेक्रेटरी भास्कर शेट्टी, क्रिकेटप्रेमी जयसुख झवेरी, राजेश शाह, अशोक चंद्रावत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List