Govinda : दोन्ही मुलं समोर, तरी सुनिताने सर्वांसमोर जे केलं, गोविंदा लालेलाल
अभिनेता गोविंदा याचं वैयक्तिक आयुष्य गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. आधी त्याच्या बंदुकीतून गोळी मिसफायर होऊन त्याच्याच पायाला लागल्याने तो जखमी होऊन रुग्णालयात भरती झाला. तिथून बरा होऊन बाहेर आल्यावर, काही दिवसांपासून त्याच्या लग्नात काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा यांच्या सर्व काही ठीक नसून, ते एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या,घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरून लागल्या. सुनिताने त्याला घटस्फोटासाठी नोटीसा पाठवली. दोघेही एकत्र एकाच घरात रहात नाही, एक ना अनेक बातम्या समोर येत होत्या.
मात्र नुकताच सुनिता यांचा एक व्हिडीो समोर आला, ज्यामध्ये त्यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या. मला आणि गोविंदाला कोणी वेगळं करून तर दाखवा, कोणातही हिंमत नाही, असे म्हणत त्यांनी घटस्फोटाच्या सर्व बातम्यांचा इन्कार केला होता. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. याच दरम्यान गोविंदा आणि सुनिता यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुनिताच्या एका कृतीमुळे गोविंदा प्रचंड लाजला.
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सुनीता आणि गोविंदाचे जुने व्हिडिओही व्हायरल होऊ लागले आहेत. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गोविंदाचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. सुनीता, तिचा नवरा गोविंदाचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असून, गोविंदाच्या वाढदिवसाचा आहे. त्यामध्ये सुनिता ही गोविंदासाठी वाढदिवसाचं गाणं उत्साहात गाताना दिसली,हसतमुखाने ती टाळ्याही वाजवत होती. सर्वांसोबत उभा असलेला गोविंदा केक कापतानाही दिसला.
जुना व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये गोविंदा आणि सुनीता यांच्याशिवाय त्यांची दोन मुलंही आहेत. केक कापल्यानंतर गोविंदा सर्वात आधी पत्नी सुनीताला केक खाऊ घालतो. त्या बदल्यात सुनीताही गोविंदाला केक खाऊ घालते आणि लगेच त्याला किस करते. गोविंदा त्यानंतर त्याच्या मुलीला आणि मुलालाही केक खाऊ घालतो.पण या व्हिडीओवर लोकांच्या बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. पत्नीने सर्वांसमोर किस केल्याने गोविंदा लाजून लालेलाल झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तर सुनिताच्या या कृतीमुळे त्यांची मुलंही थोडी ऑकवर्ड झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
मुळातच सुनीता ही आनंदी असली असून ती मनमोकळेपणाने आपल्या भावना सर्वांसमोर मांडते. जेव्हाही ती एखाद्या शोमध्ये येते, तेव्हा ती अनेकदा हसताना आणि मस्करी करताना दिसते. दरम्यान, घटस्फोटाच्या बातम्यांबाबत गोविंदाच्या वकिलाने सांगितले की, सुनीताने 6 महिन्यांपूर्वी कायदेशीर कारवाई केली होती. मात्र नंतर तिने पती गोविंदासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही सध्या एकत्र आनंदी असून त्यांच्यात घटस्फोट झालेला नाही,असे त्यांनी स्पष्ट केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List