कन्नड बोलता येत नाही म्हणून कन्नडिगांचा उन्माद; कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी चालकाच्या तोंडाला काळे फासले

कन्नड बोलता येत नाही म्हणून कन्नडिगांचा उन्माद; कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी चालकाच्या तोंडाला काळे फासले

महाराष्ट्रातील एसटीचालकांना कन्नड भाषा बोलता येत नाही म्हणून कन्नडिगांनी उन्माद घातला. शुक्रवारी रात्री कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांशी हुज्जत घातली. एसटीचालकांना कन्नडमध्ये बोला अशी सक्ती करत तोंडाला काळे फासले. या घटनेमुळे सीमा भागातील मराठी जनतेत संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक बस प्रवाशांना घेऊन मुंबईहून बंगळुरूला जात होती. त्यावेळी चित्रदुर्गजवळ काही कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (एमएच-14, केक्यू-7714) या क्रमांकाच्या बसला रोखले आणि बसचालक भास्कर जाधव बसमधून खाली उतरवत त्याच्याशी हुज्जत घातली. महाराष्ट्रातील बसचालक मराठी व हिंदीमध्ये त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्हाला कर्नाटकात यायचे असेल तर कन्नड यायलाच पाहिजे, असे म्हणत त्यांनी चालकाच्या तोंडाला काळे फासले. तसेच बसवरही काळा रंग फेकण्यात आला.

या घटनेनंतर बसचालकाने त्याची माहिती कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील एसटी बसचे अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले. ते आज एसटी महाराष्ट्रात आणणार आहेत. या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून, ‘जर सीमाभागात प्रवास करताना सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाडय़ा घेऊन जाणार नाही,’ असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारला कडक भूमिका घ्यावी लागेल – प्रताप सरनाईक

गुंडागर्दी करत महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही. परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवासी आणि ड्रायव्हर कंडक्टरची सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वारंवार अशा घटना घडत असतील तर महाराष्ट्र सरकारला कडक भूमिका घ्यावी लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

कानडी कंडक्टरचे कृत्य लपविण्यासाठी मराठीद्वेष

बेळगाव जिह्यातील बाळेपुंद्री इथे अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी कानडी पंडक्टरला जाब विचारात मारहाण करण्यात आली होती. पंडक्टरविरोधात मारहाळ पोलीस ठाण्यामध्ये ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हादेखील दाखल झाला आहे. पण, कानडी संघटनांनी मराठी भाषिकांनी कानडी पंडक्टरला मारहाण केल्याचा कांगावा करत चित्रदुर्गमध्ये मराठी बसचालकाला काळे फासले. कानडी पंडक्टरने केलेला गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिकांनाच टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेकडून चालक, वाहकाचा सत्कार

कोल्हापूर आगारातील एसटी चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात हे शनिवारी दुपारी कोल्हापुरात दाखल होताच शिवसेनेच्या वतीने त्यांना मानाचा भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सर्व एसटी चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र असल्याची ग्वाही शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिली. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कोल्हापूर एसटी विभागाचे नियंत्रक अधिकारी शिवाजी जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे आदी उपस्थित होते.

शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस कोल्हापूरमध्ये रोखल्या

कर्नाटकात घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद सीमा भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या बस अडवून कन्नडिगांच्या मुजोरीचा निषेध केला. तसेच कर्नाटकच्या बसवर भगवे झेंडे फडकवत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला. कर्नाटकात महाराष्ट्रीय व्यक्तीला मारहाण केली जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत आहेत? सीमा भागातील कन्नडिगांची दादागिरी थांबली नाही तर मोठे आंदोलन उभारून कर्नाटकच्या गाडय़ा पेटवून देऊ, असा संताप शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राने वाहतूक थांबवली

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली आहे. शनिवारी सकाळी 10 नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवली आहे. परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..