Pune News – इंदापूरात पोलिसांची धडक कारवाई, 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत

Pune News – इंदापूरात पोलिसांची धडक कारवाई, 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत

इंदापूर तालुक्यातील न्हावी गावामध्ये शेतीमालात अमली पदार्थ निर्मीतीसाठी विनापरवाना अफुची लागवड करणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची चाळीस गोण्या बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आली. अमली पदार्थ निर्मितीसाठी विनापरवाना आफुची शेती करणारे रतन कुंडलिक मारकड (50), बाळु बाबुराव जाधव (54), कल्याण बाबुराव जाधव (65) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत असताना शुक्रवार (21 फेब्रुवारी 2025) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे न्हावी (ता. इंदापूर जि. पुणे) गावच्या हद्दीत रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव या आरोपींनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड व विक्री करण्याच्या उद्देशाने उत्पादन घेतले आहे, अशी बातमी मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरील आरोपींच्या शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये म्हणून संबंधित आरोपींनी शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चोहू बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेतले होते. कारवाई दरम्यान एकूण 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे डि.वाय.एस.पी सुदर्शन राठोड, यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर स.पो.नि. राजकुमार डुणगे, स.पो.नी कुलदीप संकपाळ, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव यांसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट; जवान जखमी एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट; जवान जखमी
जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात आज एक जवान जखमी झाला. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना भूसुरुंगाचा स्पह्ट झाल्याने जवान...
भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळय़ानिमित्त बुधवारी भव्य शोभायात्रा
आंगणेवाडीत भाविकांना शिवसेनेतर्फे पाणी वाटप
22 हिंदुस्थानी मच्छीमारांची पाकच्या तुरुंगातून सुटका
मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अधिकारी ट्रॅप
डोंगरीत 58 लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक
भाजपच्या उत्तराखंडात प्रताप, वनीकरणाच्या पैशाने घेतले आयफोन