Maharashtra Karnatak Row महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणारी बससेवा बंद
कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला कानडीत बोलता येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणारी एसटी बससेवा बंद केली आहे. ”जोपर्यंत कर्नाटक सरकार या हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत कर्नाटकला जाणारी बस सेवा बंद राहणार, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील एसटीचालकांना कन्नड भाषा बोलता येत नाही म्हणून कन्नडिगांनी उन्माद घातला. शुक्रवारी रात्री कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांशी हुज्जत घातली. एसटीचालकांना कन्नडमध्ये बोला अशी सक्ती करत तोंडाला काळे फासले. या घटनेमुळे सीमा भागातील मराठी जनतेत संतापाची लाट पसरली आहे.
महाराष्ट्र सरकारला कडक भूमिका घ्यावी लागेल – प्रताप सरनाईक
गुंडागर्दी करत महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही. परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवासी आणि ड्रायव्हर कंडक्टरची सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वारंवार अशा घटना घडत असतील तर महाराष्ट्र सरकारला कडक भूमिका घ्यावी लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List