मागे वळून पाहताना- रोशन कथा

मागे वळून पाहताना- रोशन कथा

>> पूजा सामंत

सध्या नेटफ्लिक्सवर शशी रंजन दिग्दर्शित ‘द रोशन्स’ ही रोशन कुटुंबावर सादर झालेल्या वेब मालिकेला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळा आहे. इतके अभूतपूर्व प्रेम जगभरातो रसिक देतील याची आम्हा कल्पना नव्हती. वेब मालिकेचे प्रसारण 17 जानेवारी रोजी झाले आणि त्यानंतर दर मिनिटाला माझा मोबाइल वाजू लागला. क्षणाक्षणाला ‘व्हाट्स आप’ मेसेज येऊ लागले. सोशल मीडियावर सकारात्मक चर्चा सुरू झी. इतका उदंड प्रतिसाद मिळा की थोडंसं अविश्वसनीय वाटतंय. पण मनाला आलेली मरगळ या अभूतपूर्व प्रेमाने, प्रतिसादाने निघून गेली आहे. आम्ही रोशन कुटुंब पुरते भारावून गेलो आहोत…! अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राकेश रोशन सांगत आहेत त्यांची रोशन कथा…

‘द रोशन्स’ या आमच्या रोशन कुटुंबावरच्या वेब मालिकेमुळे आम्हा अनपेक्षितपणे रसिकांचं अलोट प्रेम आज लाभलं आहे. असं प्रेम आमच्या ऐन उमेदीच्या काळात आम्हा लाभलं नव्हतं. माझे वडील संगीतकार (स्व. रोशनलाल नागरथ), त्यांचा थोरला मुलगा मी राकेश रोशन, माझा धाकटा भाऊ राजेश रोशन आणि माझा मुलगा हृतिक रोशन… आम्ही सगळेच तसे प्रसिद्धीपराङमुख.  हम में से किसी ने भी अपनी कामयाबी, शोहरत के ढोल कभी नहीं  पिटवाये. यह सब करना हमें आता ही नहीं… आमच्या कामाची आम्ही कधी दवंडी पिटली नाही हा आमच्या कुटुंबाचा दोष मानावा का? हल्ली सोशल मीडियाचा हा एक मुख्य उपयोग कलावंतांना करता येतो आणि ते करतानाही दिसतात. आपला आगामी चित्रपट किंवा वेब शो, टीव्ही शो याचं ‘प्रोजेक्शन’ सहजपणे करण्याचा हा मार्ग सोपा आणि अगदीच हाताशी आहे हे सत्य नाकारता येत नाही. माझ्या वडांची संगीत कारकीर्द ऐन भरात असताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. अभिनेता म्हणून मी रुपेरी पडद्यावर कारकीर्द सुरू केली तेव्हा मलाही संघर्षाच्या त्याच चक्रव्यूहातून जावं लागलं. माझा प्रतिभासंपन्न संगीतकार भाऊ राजेश रोशन यानेही अनेक चित्रपटांना सुरेल संगीत दिलं. पण त्याच्या यशाचं योग्य मूल्यमापन चित्रपटसृष्टीने केलं नाही. ही खंत माझ्या मनात अनेक वर्षे अश्वथाम्याच्या भळभळत्या जखमेसारखी ठसठसत होती. माझ्या जखमांवर मी कधी फुंकर घातली नाही, ना मनातल्या भावनांना वाट करून दिली. हेच रोशन कुटुंबाचं प्राक्तन असावं असं मानलं.  मेणबत्ती-दिवा जळत असताना त्या ज्योतीचा प्रकाश अंधकाराला दूर करतो, पण त्या दिव्याची महती, त्याचे गोडवे कुणी गात नाही. याचा स्वीकार करून आपापलं आयुष्य मी, राजेश आणि डुग्गु (हृतिक) जगत आलोय. पण 2022 च्या सुमारास मला एक भेट मिळी. ‘सारेगामा कारवां’ या संचात अनेक सुमधुर गाण्यांचा समावेश होता. त्या सगळ्या गीतांचे संगीतकार मला ठाऊक होते. या संग्रहात माझ्याही वडिलांची अनेक उत्तम गाणी होती. त्यात अन्य संगीतकारांची नावं होती, परंतु माझ्या वडिलांचं नाव त्या श्रेयनामावलीतून गायब होतं!  हे असं कसं झालं? का व्हावं? त्यांच्या मृत्यूनंतरही हे शल्य मला अधिक जाचू लागलं. नंतर काही दिवसांनी आमचा मित्र शशी रंजन याच्याशी आमच्या फार्महाऊसवर गप्पा मारत असताना त्याला मी मनाला जाचणारी बाब बून दाखवी. माझ्या वडिलांचं श्रेय नाकारण्यात आलं आहे मित्रा! ािगा केस की तर त्याचा न्यायनिवाडा होईलच. पण माझ्या वडिलांची संगीताती नेत्रदीपक कामगिरी जगाला, विशेषत नव्या पिढीला कशी समजेल? माझी खंत मी व्यक्त केली आणि तेव्हाच त्याच्या डोक्यात ‘द रोशन्स’ या वेब मालिकेने जन्म घेतला! आमची ही संकल्पना नेटफ्लिक्सने उचलून धरली. ‘द रोशन्स’ ही वेब मालिका माझे वडील रोशनलाल नागरथ यांच्यापुरती मर्यादित न ठेवता एकेक स्वतंत्र भाग आम्हा चौघांवर करण्याचं सर्वानुमते ठरलं.

रोशना यांच्या गाजलेल्या गीतसंग्रहातून आजही सर्वोत्तम कव्वाली म्हणून ‘ना तो कारवाँ की तलाश हैं’ (बरसात की रात), ‘ये इश्क इश्क’सारखी यादगार कव्वाली, ‘ए री मैं तो प्रेम दीवानी’ हे भजन असो वा ‘जो वादा किया वो निभाना पड़ेगा’ हे प्रेमगीत असो.  ‘छूपा लो दिल में यूँ प्यार मेरा’ हे विरह गीत… वडिलांनी अत्यंत दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण संगीत त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना दिलं. तरीही यश त्यांच्याशी ऊन-सावलीचा खेळ खेळत राहिलं. त्यांचा संघर्ष, त्यांची तळमळ, संगीतावरची असीम निष्ठा, जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती, यामुळे ते नैराश्याकडे दुर्लक्ष करत राहिले.

वडिलांना असंख्य रात्री तळमळताना मी पाहिलंय. ते स्थिरस्थावर होत होते आणि त्यांचं देहावसान झालं. पुढे काय…  आम्ही सगळे त्या चक्रात अडकलो. माझा संघर्ष आता घर चालवण्यासाठी सुरू झाला. मी रोशन यांचा मुलगा, अशी माझी ओळख करून द्यावी ाागी. अन्यथा मला कोणी उभं कां नसतं. त्यांच्या नावाच्या प्रभावळीचा त्यांना फायदा झाला नाही. ते तसे उपेक्षित जीवन जगो. हळहळू मला हिंदी चित्रपटांतून सेकंड लीड आक्टरनंतर फर्स्ट लीड रोल मिळाया ाागो. देखण्या नायकांमध्ये माझी गणना झाली, पण माझ्या नायिका रेखा, जयाप्रदा, हेमामाािनी याच भाव खाऊन गेल्या. माझ्या चित्रपटांचं श्रेय मला मिळां नाही. बासू चॅटर्जींच्या ‘प्रियतमा’मध्ये मला मुख्य हिरोची भूमिका देण्यात आली होती. पण नायिका नीतू सिंगा मी नायक आहे हे समजताच तिने नकार दिला. बासुदांनी मग भूमिकांची अदलाबदल केली. जितेंद्रला माझी भूमिका दिली आणि मला त्याची. नंतर नीतू सिंग माझ्या अतिशय जीवलग मित्र ऋषी कपूरची पत्नी झाली.

नायकाच्या भूमिका फारशा वाट्याला येत नाहीत म्हणून मी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं. पण मला दिग्दर्शनाचं शिवधनुष्य देणार कोण? या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी स्वतच निर्माता बनो. ‘आप के दिवाने’ हा माझा निर्माता म्हणून पहिला चित्रपट जो अपयशी ठरला. मग मी दिग्दर्शक होण्याचं धारिष्ट्य दाखवां आणि ‘खुदगर्ज’ का. दोन मित्रांची मैत्री आणि वैर यावर आधारित असलेल्या ‘खुदगर्ज’ने तुफान यश मिळवलं. किशन कन्हैय्या, करण अर्जुन या चित्रपटांनी मा निर्माता-दिग्दर्शक म्हणून यशस्वी कां. ‘करण अर्जुन’साठी आमिर खान-अजय देवगण यांना घेण्याचा विचार होता. पण त्यांचा होकार आाा नाही. आमिर खान हो म्हणाला तेव्हा अचानक सलमानचा होकार आला. मग शाहरुख खाननेही होकार दिला. मग शाहरुख-सामान फायना झो. अनेक मुद्द्यांवर शाहरुख-सलमान यांनी माझ्याशी हुज्जत घातली. पुनर्जन्मावर या काळात चित्रपट हिट होणार नाही असं दोघे पुनः पुन्हा सांगत राहिले. पण मी अटळ विश्वासावर पुढे गेलो आणि ‘करण-अर्जुन’ हिट ठरला. नंतर ‘कोयला’साठी मी कोणती अग्निदिव्यं पार करणार हा एक बिकट प्रश्न होता. ‘कोयला’साठी मोठ्या रकमेची कर्जं काढली. माझं राहतं घर गहाण ठेवलं. रात्रीची झोप उडाली होती. काही रिशूटिंगही झालं होतं. ‘कोयला’ पूर्ण करताना माझ्या नाकी नऊ आले. ‘कोयला’च्या कर्जातून बाहेर येण्यासाठी अजून मोठी रिस्क घेतली, ‘कहो ना प्यार है’ची निर्मिती-दिग्दर्शन करून.

बबिता माझी एके काळची ‘अंजाना’ फिल्मची नायिका. तिचे माझे व्यावसायिक संबंध उत्तमच होते. बबिताची मुलगी करिना कपूर (खान) तेव्हा फिल्ममध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचं मी ऐकून होतो. बबिताला याबद्दा विचारताच तिने आनंदाने होकार दिला. करिनाचे ‘कहो ना प्यार है’चे कॉश्च्युम्स शिवून तयार होते. शूटिंग सुरू झां आणि बबिताने गुगली टाकली. बेबोचा फर्स्ट सीन गाण्याने सुरू होणार नाही. तिच्यासाठी एखादा सशक्त सीन हवा. मी त्या नकार दिला. अशा अनेक कारणांनी मी त्रस्त झालो आणि करिनाने ‘कहो ना प्यार है’ सोडला. शूटिंगचे सेट्स, बँकॉकच्या शूटिंगच्या डेट्स, न्यूझीलंड लोकेशन्स… सगळी तयारी होती आणि नायिकेने अचानक एक्झिट घेतल्याने मी खूप तणावात आलो. मेरे बेटे (हृतिक) का करियर भी दांव पर लगा हुआ था!  त्या सगळ्यात एका लग्नाला जाण्याचा योग आाा. तिथे माझा मित्र अमित पटेल याची मुलगी अमिषा पटेल हिच्याशी भेट झाली. मी तिला सहज विचारलं, ‘हृतिक की हिरोईन बनना चाहोगी?’ यावर तिने आनंदाने होकार दिला. अभिनयाचं कुठांही प्रशिक्षण न घेतोल्या अमिषा पटेलसारख्या नवोदित मुलीला घेऊन मी सिनेमा पूर्ण केला. याचं संगीत गाजां, चित्रपट गाजा आणि माझा मागा हृतिकच्या करिअरने टेक आाफ घेता. ‘कोयला’चे अपयश ‘कहो ना प्यार’ने धुऊन काढलं. पुढे ‘कोई मिल गया’च्या वेळी मी हृतिका मतिमंद मागा म्हणून दाखवलं. अनेकांनी मला मूर्खात काढलं. पण मी ठाम राहिलो. नंतर ‘क्रिश’ने यशाचा वेलू गगनावरी नेला. ‘कहो ना प्यार है’च्या यशाचा कैफ चढण्यापूर्वी माझ्यावर माफिया हल्ला झाला. दैव बलवत्तर म्हणून या प्राणघातक हल्ल्यातून मी बचावो. मग मला कॅन्सर झाला. माझ्या मुलाही कॅन्सरने गाठलं. पण आम्ही कॅन्सरशीसुद्धा कडवी झुंज दिली. शायद विधाता की यही मर्जी थी! परिश्रम, संघर्ष आणि तपश्चर्या हेच रोशन कुटुंबाचं प्राक्तन असावं. लवकरच मी ‘क्रिश 4’ सुरू करतोय. नायक अर्थात हृतिकच असा.

जीवनाच्या हिंदोळ्यावर कारकिर्दीच्या 75 व्या वर्षी मागे वळून पाहताना वाटतं की, यशापेक्षा अपयशाने मला जास्त शिकवलं. ज्यातून मी प्रेरणा मिळवली!!

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मग कळेल खरी शिवसेना कोणती…संजय राऊतांनी तोफ डागली, ‘वो डरा हुआ आदमी’, सकाळी सकाळी कुणाची विकेट काढली? मग कळेल खरी शिवसेना कोणती…संजय राऊतांनी तोफ डागली, ‘वो डरा हुआ आदमी’, सकाळी सकाळी कुणाची विकेट काढली?
काल पुण्यात झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण हे स्पष्ट झाल्याचे वक्तव्य केले. तर...
‘पैसे येणं बंद झालं म्हणून हा मार्ग निवडलाय’; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचं सडेतोड उत्तर
‘छावा’ सिनेमा पाहणं पडलं महागात, मकोकातील 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
‘हे काय वागणं?; नीतू कपूर यांना नातीने ढकललं, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!
एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊत यांचं आव्हान
आनंद कट्टींचे ‘स्मरण’, बोरिवलीत आज संगीत मैफल
गुगलचे एआय नोकरी शोधण्यास मदत करणार