कथा एका चवीची- इंडो चायनीज मंचाव सूप

कथा एका चवीची- इंडो चायनीज मंचाव सूप

>> रश्मी वारंग

चायनीज खाद्यपदार्थांतील सगळ्यांचं आवडतं म्हणजे सूप. यातही बहुतांश भारतीय मंडळींचा आवडता पर्याय म्हणजे मंचाव सूप. 

चायनीज पदार्थांचा अस्सल टॅग मिरवणाऱया  मंचाव सूपची ही कहाणी.

काही पदार्थ कोणत्या प्रांतातील असतील याबद्दल आपली काही ठाम मते असतात. या पदार्थांना लागलेला चायनीज पदार्थांचा टॅग आपण डोळे मिटून मान्य केलेला असतो, पण वस्तुस्थिती वेगळी असू शकते. अशीच वेगळी कहाणी सांगणारा पदार्थ म्हणजे मंचाव सूप. हॉटेलमध्ये गेल्यानंतर सूप पिणार का? या प्रश्नाला बहुतांश भारतीय मंडळी ज्या पर्यायाने होकार देतात तो अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे मंचाव सूप!

अनेकांना मंचाव हा शब्द मंचुरियन या शब्दापासून निर्माण झालेला वाटतो. चीनमधील विशिष्ट मंचुरियन प्रांताचा या सूपशी संबंध असावा असेही अनेकांना वाटते. प्रत्यक्षात मंचुरियन या प्रांताची पदार्थ बनवण्याची शैली पूर्णत वेगळी आहे. तिचा या सूपशी काहीही संबंध नाही. चायनीजमध्ये चाओ म्हणजे नूडल्स. छोटे कांदे, कोबी आणि अन्य अनेक घटक या सूपमध्ये समाविष्ट असतातच, पण त्या जोडीला नूडल्सही आढळतात.

एकूणच रंग, रूप या सगळ्या बाबतीत चायनीज वाटणारे हे सूप मात्र इंडो चायनीज पदार्थांचा एक भाग आहे. काहीजण या पदार्थाच्या उगमाचे स्थान मेघालय असे सांगतात, तर काहींच्या मते ते कोलकाता आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश आमदनीत कोलकाता ही ब्रिटिशांनी निवडलेली भारताची राजधानी होती. या स्थानामुळे विविध प्रकारचे व्यवसाय या भागात बहरले होते. त्याचा फायदा घेण्यासाठी परदेशातूनही अनेक व्यापारी कोलकातामध्ये यायचे. त्यामध्ये काही चायनीज व्यापारीही होते. कामाच्या निमित्ताने कोलकातामध्ये दीर्घकाळ राहावे लागत असताना त्यांच्या चवीचे चायनीज फूड त्यांना मिळणे कठीण होते. त्यामुळे स्थानिक पदार्थांचा वापर करून त्याला चायनीज पाककृतीची ढब देऊन या व्यापाऱयांनी तयार केलेला पदार्थ म्हणजे मंचाव सूप असे म्हटले जाते.

याशिवाय दुसरी कथा सांगते की, भारतातील मेघालय जे भारत-चीन सीमेच्या जवळचे राज्य आहे, तिथे मंचाव सूपचा उगम झाला आणि पुढे ते कोलकातामध्ये आले.

बहुतांश चायनीज सूपचा महत्त्वाचा भाग म्हणजे सोया सॉस आणि विनेगर. मंचाव सूपमध्ये त्याचा वापर होतोच, पण मुख्यत भारतात आढळणाऱया भाज्या आणि अन्य गोष्टी या सूपमध्ये मुबलक प्रमाणात वापरल्याचे दिसून येते. हे सूप भारतात लोकप्रिय होण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मुबलक प्रमाणात भाज्यांचा वापर. रोजच्या खाण्यातील भाज्या या सूपमध्ये अगदी सहज मिसळून गेलेल्या दिसतात. पचन क्रियेसाठीदेखील हे सूप उपयोगी ठरू शकते. भारतातील शाकाहारी संस्कृतीलादेखील हे सूप पूरक ठरलेले दिसते. यातल्या भाज्या कमी-जास्त होऊ शकतात हे महत्त्वाचे.

सगळ्यात गंमतीचा भाग म्हणजे भारतीय मंडळी या सूपला चायनीज पदार्थ म्हणून पीत असले तरी चायनीज मंडळी मात्र हे सूप त्यांच्या स्वयंपाकघरात बनवत नाहीत.

अमेरिकन चायनीजप्रमाणेच इंडो चायनीज हे मूळ पदार्थांपेक्षा पूर्णत वेगळे ठरलेले दिसते. मंचाव सूप त्याचाच एक भाग ठरते.

भारतातल्या सर्वात महागडय़ा हॉटेलपासून ते रस्त्यावर बनणाऱया चायनीजपर्यंत मंचाव सूप यत्र तत्र सर्वत्र आढळते. अर्थात या सूपमध्ये लोटल्या जाणाऱया भाज्या वैविध्यपूर्ण असल्यामुळे प्रत्येक ठिकाणची चव निराळी. मंचाव सूपचा उगम मेघालय असो वा कोलकाता, आज मात्र हे सूप संपूर्ण भारतभरात यशस्वी वाटचाल करताना दिसते. हा पोटभरीचा पदार्थ आहे. सामान्यपणे सूप प्यायल्यावर आपली भूक प्रज्वलित होते आणि बाकीचे अन्न खाण्यासाठी पोट सिद्ध होते. मात्र अनेकदा हे सूप पिऊन भूकेऐवजी पोट भरल्याचा अनुभव येतो. खिशाला परवडणारे तरीही पौष्टिक आणि चवदार असे हे इंडो चायनीज सूप म्हणजे चायनीज नसलेली चायनीज मेजवानीच.

 (लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मग कळेल खरी शिवसेना कोणती…संजय राऊतांनी तोफ डागली, ‘वो डरा हुआ आदमी’, सकाळी सकाळी कुणाची विकेट काढली? मग कळेल खरी शिवसेना कोणती…संजय राऊतांनी तोफ डागली, ‘वो डरा हुआ आदमी’, सकाळी सकाळी कुणाची विकेट काढली?
काल पुण्यात झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण हे स्पष्ट झाल्याचे वक्तव्य केले. तर...
‘पैसे येणं बंद झालं म्हणून हा मार्ग निवडलाय’; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचं सडेतोड उत्तर
‘छावा’ सिनेमा पाहणं पडलं महागात, मकोकातील 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
‘हे काय वागणं?; नीतू कपूर यांना नातीने ढकललं, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!
एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊत यांचं आव्हान
आनंद कट्टींचे ‘स्मरण’, बोरिवलीत आज संगीत मैफल
गुगलचे एआय नोकरी शोधण्यास मदत करणार