Night Skinacare: चमकदार त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर ‘या’ तेलाचा वापर, पिंपल्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्या होतील छुमंतर….
प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. चमकदार त्वचेसाठी अनेक स्किन केअर टिप्स फॉलो केल्या जातात. परंतु, वातावरणातील बदलामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळपट आणि लालसर होते. सूर्यप्रकाशामुळे आजकाल टॅनिंगची समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती कोरडी होते. त्वचवरील चमक कायम ठेवण्यासाठी त्यामध्ये हायड्रेशन असणे गरजेचे असते. त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक क्रिम्स उपलब्ध आहेत. परंतु या क्रिम्सच्या वापरामुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. क्रिम्समधील रसायनिक पदार्थांमुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो.
त्वचेला नैसर्गिकरित्या मॉईश्चरायझ करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय करू शकता. निरोगी आणि हायड्रेटेड त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आणि योग्य आहाराचा समावेश करावा. तुमच्या आहारामध्ये फळांचा योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. लिंबाचा किंवा व्हिटॅमिन सीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे किंवचा व्हिटॅमिन सी सीरम्स चेहऱ्यावर लावल्यामुळे टॅनिंग आणि पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुम्हाला पिंपल्स आणि पिग्मेंटेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
निरोगी त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर तेलानी मसाज करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि पिंपल्स सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी त्यावर फेस ऑईलचा वापर केला जातो. चेहऱ्यावर तेलानी मसाज केल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तेलामध्ये हेल्दी फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. चेहऱ्यावर तेलानी मसाज केल्यामुळे चेहरा उजळतो, त्यासोबतच त्यावरील मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण होते. चेहऱ्यावर नारळाच्या तेलानी मसाज केल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात. खोबरेल तेलाचा वापरामुळे चेहऱ्याला नैसर्गिक हायड्रेशन मिळते. परंतु मार्केटमध्ये काही असे ऑईल मिळतात ज्यांचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील कोलोजनची मात्रा वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया खोबरेल तेला ऐवजी चेहऱ्यावर कोणते तेल वापरणे फायदेशीर ठरेल.
आर्गन ऑईल – निरोगी त्वचेसाठी त्याच्यावर आर्गन ऑईलचा वापर करू शकता. चेहऱ्यावर आर्गन ऑईलचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात. आर्गन ऑईलमध्ये हेल्दी फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. आर्गन ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि लिनोलेनिक अॅसिड असते ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते.
जोजोबा ऑईल – जोजोबा ऑईलमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतात. जोजोबा ऑईलने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जोजोबा ऑईलच्या वापरामुळे मुरूम आणि डागांच्या समस्या दूर करण्यास मदत होते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जोजोबा तेलाचा वापर करणं टाळावे.
बदाम ऑईल – तुमच्या चेहऱ्यासाठी बदामाचे तेल अत्यंत फायदेशीर ठरते. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलानी ममसाज केल्यामुले त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
‘या’ गोष्टी नेमही लक्षात ठेवा :
तुमचा चेहरा तेलकट असेल तर चेहऱ्यावर मसाज ऑईलचा वापर टाळावे.
पिंपल्सच्या समस्या असल्यास हलक्या कोमट पाण्यानी चेहरा धुवा.
संवेदनशील त्वचेवर फेस ऑईलचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
तुमच्या त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर ठरते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List