बीडमधील सत्ता, पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे!सुप्रिया सुळे यांच्याकडून देशमुख कुटुंबाचे सांत्वन

बीडमधील सत्ता, पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे!सुप्रिया सुळे यांच्याकडून देशमुख कुटुंबाचे सांत्वन

बीड जिल्हय़ात सत्ता, पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर सुरू असलेली मस्ती उतरलीच पाहिजे. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असून आम्ही देशमुख कुटुंबाबरोबर आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर होते.  सुप्रिया सुळे यांना पाहताच देशमुख कुटुंबाचा बांध फुटला. माझा मुलगा गावाच्या भल्यासाठी झटत होता. म्हणूनच आज गाव आमच्या पाठीशी उभे आहे, हे सांगताना संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाले.

 मी तुमच्यासाठी लढत राहीनः सुप्रिया सुळे

देशमुख कुटुंबाचे सांत्वन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण न्यायासाठी पदर पसरणार असल्याचे सांगितले. संतोष देशमुख यांना तर मी परत आणू शकत नाही, पण तुमच्या नातवांसाठी मी न्याय मिळेपर्यंत लढत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा कट होता!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा कट पोलिसांनी रचला होता, असा खळबळजनक आरोप गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर केला. संतोष देशमुख यांना घेऊन निघालेली रुग्णवाहिका कळंबकडे वळवण्यात आली होती. तेथे एका महिलाही तयार ठेवण्यात आली होती. तिच्या घरी मृतदेह टाकून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांना दाखवायचे होते. परंतु मस्साजोगच्या तरुणांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला आणि हा सर्व कट उधळला गेला, असे गावकऱ्यांनी सांगितले.

नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. जलदगती न्यायालयात खटला चालवावा. सर्व आरोपींची ईडी तसेच सीबीआय चौकशी झाली पाहिजे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक झाली पाहिजे. देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. संपूर्ण आरोपींचे सीडीआर तपासले पाहिजे अशा मागण्या सुळे यांनी केल्या.

 ज्ञानेश्वरी मुंडेंना अश्रू अनावर

परळी येथील महादेव मुंडे यांचा पंधरा महिन्यांपूर्वी निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. आज मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला खासदार सुप्रिया सुळे परळीत पोहचल्या. सुप्रिया सुळेंना पाहताच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंना अश्रू अनावर झाले. ‘माझ्या नवऱ्याचा काय दोष होता?’ असा सवाल करत त्यांनी टाहो फोडला. पंधरा महिने होऊन गेले. ना तपास, ना आरोपीला अटक. पोलीस काही माहिती देत नाहीत. जो अधिकारी आरोपींच्या दारात पोहचला होता त्याला अज्ञात इसमाचा फोन आला आणि तो अधिकारी माघारी फिरला. त्यानंतर त्याचे प्रमोशन करण्यात आले, असा गौप्यस्फोट ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली  ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता...
ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश
धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर
दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज
शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के, 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द, जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी