मध्यरात्री रस्त्यावर अभिनेत्रीला शिवीगाळ, घाबरलेल्या अवस्थेत होती, बऱ्याच वर्षांनी प्रसिद्ध सेलिब्रिटीची पोलखोल
Actress Life: झगमगत्या विश्वात अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडचा निरोप घेतला. पण अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीनी त्यांच्यासोबत घेडलेल्या सत्य घटना सांगितल्या. आता अभिनेत्री शीबा आकाशदीप हिने धक्कादायक खुलासा केला आहे. मध्यरात्री रस्त्यात एका प्रसिद्ध अभिनेत्याने शिवीगाळ केली होती. अभिनेत्रीसोबत गैरवर्तन करणारा अभिनेता दुसरा तिसरी कोणी नाही तर, अभिनेता आदित्य पंचोली आहे.
1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘सुरक्षा’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान शीबा आणि आदित्य यांच्यामध्ये वाद झाले होते. एका मुलाखतीत शीबा म्हणाली, ‘मी पूर्णपणे थकलेली होती. मध्यरात्रीची गोष्ट आहे. दोन शिफ्ट केल्यानंतर मी सेटवर पोहोचली होती. मी माझ्या कारमध्ये चादर घेवून झोपली होती. अखेर मी माझ्या शॉटसाठी निघाले आणि त्यावेळी व्हॅन नव्हती. दिग्दर्शक शॉट समजावून सांगत होता. आणि मागे वळून काहीतरी बोलला… असं कर… मला खूप झोप लागली होती. मी म्हटलं, तू तुझं काम कर. ‘
‘असं म्हणाल्यामुळे तो प्रचंड रागावला होता. तेव्हा प्रचंड शिवीगाळ, ओरडा-ओरडी सुरु होती. मध्य रात्री रस्त्यावर हे सर्वकाही सुरु होतं. मी पूर्ण घाबलेल्या अवस्थेत होती. मी निर्मात्यांकडे पाहिलं देखील पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं देखील नाही. अभिनेता – अभिनेत्री सेटच्या मध्यभागी भांडत असताना त्यांना काय करावे हेच कळत नव्हतं. अशात मी माझ्या गाडीत बसले मी दरवाजा बंद केला. मी अशा प्रकारे सेट सोडण्याची ही पहिलीच वेळ होती.’
पुढे अभिनेत्री म्हणाली. ‘कोणी अभिनेत्री शिव्या देत आहे आणि तुम्हाला एक शब्द देखील बोलता येत नाही. मी त्यांनी म्हणाली, मी आता काम करणार नाही. सेटवर देखील येणार नाही…’, सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सिनेमा राजू मवानी यांनी निर्मीत आणि दिग्दर्शित केला होता. सिनेमात सुनिल शेट्टी, सैफ अली खान, दिव्या दत्ता, मोनिका बेदी, कादर खान यांसारख्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List