धनंजय मुंडे खूपच घोटाळेबाज, लफडेबाज
धनंजय मुंडे खूपच घोटाळेबाज, लफडेबाज असून तो राज्याला लागलेला दुर्दैवी डाग आहे. गोरगरीबांच्या ताटात माती कालवणे त्यांचा पिंड आहे. इतका भ्रष्टाचार एक मंत्री करत असेल तर त्याला सरकार जवळ करते कसे, हा मोठा प्रश्न आहे. सरकार जर कारवाई करणार नसेल तर जनतेला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मीपण आता मागे लागणार आहे. मीपण सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. मी सुट्टी घेऊन आता टप्प्याटप्प्याने कामाला लागणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले. धनंजय मुंडे हे आरोपी फरार करायला फिरत आहेत. बाहेरचे आणि आतले आरोपी सांभाळताहेत. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतः काम करताहेत, असा दावाही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. धनंजय मुंडेंचीसुद्धा ईडी चौकशी लागली पाहिजे. हे पैसे कुठून आले? प्रॉपर्टी कुठून आली? कोणत्या योजनेत भ्रष्टाचार केलाय? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List