सकाळी भिजवलेले ‘हे’ कडधान्य खा आणि दिवसभर ताजेतवाने राहा!!!
चण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. म्हणूनच भिजवलेले चणे मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला आहार मानला जातो.
चण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. भिजवलेले चणे नियमित खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते.
चण्यामध्ये प्रथिने, जस्त आणि इतर खनिजे असतात, जे केस आणि त्वचेचे आरोग्य राखतात. हे त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास आणि केसांना मजबूत करण्यास मदत करते.
रात्रभर हरभरा पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मूठभर हरभरा खा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List