या ५० देशांच्या जीडीपी पेक्षाही मुंबई महानगर पालिकेचे बजेट मोठे, पाहा कोणते देश?

या ५० देशांच्या जीडीपी पेक्षाही मुंबई महानगर पालिकेचे बजेट मोठे, पाहा कोणते देश?

देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा आर्थिक गाडा चालविणारा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. या मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प ७४,४२७ कोटी रुपयांचे म्हणजे सुमारे ८.५० अब्ज डॉलर इतके आहे. एवढे बजेट देशातील अनेक राज्याचे देखील नाही. खास म्हणजे जगातील सुमारे ५० असे देश आहेत, ज्यांचा जीडीपी ८.५० अब्ज डॉलर देखील नाही. या देशात मॉन्टेंगरो, मालदीव, बारबडोस, भूटान, जांबिया आदी देश आहेत. मुंबईचा अर्थसंकल्पाचा आकडा इतका मोठा का आहे. जगात असे कोणते देश आहेत ज्यांचा जीडीपी मुंबई महानगर पालिकेच्या बजेट पेक्षा कमी आहे.

देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेने साल २०२५-२६ साठीचे ७४,४२७ कोटी रुपयाचे बजेट सादर केले आहे. ७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर महानगर पालिकेवर आता प्रशासकाचे राज्य आहे. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या मते मुंबई महानगर पालिकेने सादर केलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात ७,४१० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ४३,१६६ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी राखून ठेवले आहेत,ते एकूण बजेटच्या ५८ टक्के आहेत. रस्त्याच्यां क्राँक्रिटी करणाचे काम ज्या एजन्सींना देण्यात आले आहे त्यांच्यानुसार, आयआयटी मुंबई शहरातील काँक्रिटीकरणाच्या कामांवर लक्ष ठेवणार आहे. पावसाळ्याचा कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. आरोग्य सेवांवर बजेटच्या १० टक्के रक्कम खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आरोग्य सेवा आपल्या दारी योजनेअंतर्गत मुंबईभर घरोघरी आरोग्य तपासणी सुरू करण्याची योजना बीएमसीने आखली आहे.

अनेक देशांचा जीडीपी देखील इतका नाही

मुंबई महानगर पालिकेचे वार्षिक बजेट इतके मोठे आहे की अनेक देशांचा जीडीपी देखील तेवढा नाही. भूतान देशाचा जीडीपी ३ अब्ज डॉलरपेक्षा थोडा अधिक आहे. फिजीच्या एकूण देशाचा जीडीपी ५.८ अब्ज डॉलर आहे. मालदीवचा एकूण जीडीपी ७.१ अब्ज डॉलर आहे.बार्बोडोसचा एकूण जीडीपी ६.८ अब्ज डॉलर आहे. मॉन्टेंगरो सारख्या देशाचा जीडीपी ८ अब्ज डॉलर आहे. तर मुंबई महानगर पालिकेचा जीडीपी ८.५ अब्ज डॉलर आहे. असे जगातील ५० देश असे आहेत ज्यांचा जीडीपी सध्या मुंबई महानगर पालिकेच्या बजेटपेक्षा कमी आहे.

शिक्षणासाठी खर्च

मुंबई महानगर पालिककडे ४७० शाळा आहे. ज्यातील ४५ शाळांचा आधुनिकीकरण सुरु आहे. ही प्रक्रीया मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. तर ३६ शाळांचे आधुनिकरण पुढच्या पूर्ण होणार आहे. ७,९३४ तुकड्यांपैकी ३८१४ तुकड्यांना आधीच डिजिटल केले आहे. मुंबई महानगर पालिकेने शिक्षक पदासाठी ६२२ उमेदवारांना नियुक्तीपत्र जारी केले आहे. १०० पालिका शाळांमध्ये जैविक शेती उद्यान उभारण्यात येणार आहेत.

पर्यावरणावर खर्च

प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने आपल्या २४ वॉर्डात १०० बॅटरी सक्शन मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे. बेकरींना पारंपारिक लाकडांऐवजी सीएनजीवर चालविण्याची योजना आहे. कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यापासून वीज निर्मितीची योजना आकाराला येत आहे. मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड पालिका पुन्हा ताब्यात घेणार आहे. २४ हेक्टर जागेला पुन्हा प्राप्त करण्यासाठी जून २०२५ पर्यंत एकूण ७० लाख मेट्रीक टन जुना कचरा साफ करून त्याचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली  ‘तो’ भूखंड काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हालचाली
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता...
ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश
धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर
दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज
शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के, 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द, जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी