IMD Cyclone Alert : देशावर मोठ्या चक्रीवादळाचं संकट, पुढील 48 तास धोक्याचे; अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट
मोठी बातमी समोर येत आहे, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आयएमडीकडून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये लडाख आणि जम्मू -काश्मीरमध्ये अतिमुसळधार पावसासह जोरदार बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू -काश्मीरसोबतच पुढील दोन दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्ताखंडच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडू शकतो.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार बांगादेश आणि आसामवर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. यामुळे पुढील 48 तासांमध्ये आसाम, मेघालय, आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List